काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यात त्यांनी न्यूजलॉण्ड्री या वेबसाईटचा हवाला देत फडणवीसांच्या मतदारसंघात सहा महिन्यात २९ हजार मतदार वाढल्याची आकडेवारी देत टीका केली आहे. त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत झूठ बोले कौआ काटे…अशी टिप्पणी केली आहे.
महाराष्ट्रातील आपला दारुण पराभव तुम्हाला दिवसेंदिवस अधिक वेदनादायक वाटू लागला आहे. पण किती काळ हवेतच बाण सोडत राहणार आहात?, असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.
फडणवीसांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर, महाराष्ट्रात असे २५ हून अधिक मतदारसंघ आहेत जिथे लोकसभा व विधानसभा निवडणुकांदरम्यान ८% पेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे.
हे ही वाचा:
अबू आझमींनी घासले नाक, म्हणाले “…तो हेतू नव्हता! “
ट्रम्प यांनी इस्रायल-इराण युद्ध संपल्याची घोषणा केली; इराणचा मात्र नकार
एसटीला १०,३२२ कोटींचा संचित तोटा, पण नफ्यात आणणार!
माझ्या दक्षिण-पश्चिम क्षेत्राला लागून असलेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात ७% म्हणजे २७,०६५ मतदार वाढले आणि तिथे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे विजयी झाले. उत्तर नागपूरमध्ये ७% म्हणजे २९,३४८ मतदार वाढले आणि काँग्रेसकडून नितीन राऊत विजयी झाले. पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरीमध्ये १०% म्हणजे ५०,९११ मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे विजयी झाले. मालाड पश्चिममध्ये ११% म्हणजे ३८,६२५ मतदार वाढले आणि तुमच्याच काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख विजयी झाले. मुंब्रामध्ये ९% म्हणजे ४६,०४१ मतदार वाढले आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड विजयी झाले.
सहकारी पक्षांचे नसले तरी, स्वतःच्या पक्षातील अस्लम शेख, विकास ठाकरे, नितीन राऊत यांसारख्या जुन्या सहकाऱ्यांशी या ट्वीटपूर्वी एकदा चर्चा केली असती, तर चांगले झाले असते. किमान काँग्रेसमध्ये संवादाचा अभाव इतका भयंकर दिसून आला नसता, असेही फडणवीस म्हणाले.
