27 C
Mumbai
Sunday, January 18, 2026
घरदेश दुनिया“भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यास लष्करी रणनीतीकार, विद्यार्थी करतील”

“भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यास लष्करी रणनीतीकार, विद्यार्थी करतील”

अमेरिकन शहरी युद्ध तज्ज्ञ कर्नल (निवृत्त) जॉन स्पेन्सर यांनी मांडले मत

Google News Follow

Related

भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे जगभरातून कौतुक होत असून या माध्यमातून भारताच्या लष्करी ताकदीची झलकही जगाने पाहिली आहे. ऑपरेशन सिंदूरचे समर्थन करताना अमेरिकन शहरी युद्ध तज्ज्ञ यांनी म्हटले की, भारताने आक्रमक आणि बचावात्मक अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठता दाखवली आहे. यामुळे असा संदेश मिळाला की भारत पाकिस्तानात कुठेही आणि कधीही हल्ला करू शकतो. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले.

कर्नल (निवृत्त) जॉन स्पेन्सर म्हणाले की, पाकिस्तान वापरत असलेली चिनी हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांशी जुळत नाही. ज्यांचा वापर युद्धादरम्यान लष्करी तळांवर हल्ला करण्यासाठी केला गेला. भारताने पाकिस्तानी ड्रोन हल्ले आणि हायस्पीड क्षेपणास्त्रांपासून यशस्वीरित्या स्वतःचा बचाव करण्यात यश मिळवले आहे, असे स्पेन्सर म्हणाले.

स्पेन्सर पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागली. भारताचा राजकीय आणि लष्करी संदेश स्पष्ट करण्यात आला होता की आम्हाला युद्ध नको, परंतु आम्ही दहशतवादाला शिक्षा देऊ. ते पुढे म्हणाले की, या ऑपरेशनचा अभ्यास येत्या काही वर्षांत लष्करी रणनीतीकार आणि विद्यार्थी करतील. ‘ऑपरेशन सिंदूर’चे दहशतवादाविरुद्ध लढणारे इतर देश अनुकरण करू शकतात असे एक उदाहरण आहे. उपग्रह प्रतिमा आणि छायाचित्रे प्रसिद्ध करणे यासह भारताच्या धोरणामुळे प्रत्येकाला पडताळणीयोग्य तथ्ये उपलब्ध झाली आहेत, असेही म्हणाले.

मॉडर्न वॉर इन्स्टिट्यूटमध्ये शहरी युद्ध अभ्यासाचे अध्यक्ष म्हणून काम करणारे जॉन स्पेन्सर यांनी म्हटले की, पाकिस्तान वापरत असलेल्या चिनी हवाई संरक्षण यंत्रणेत प्रवेश करण्याची ब्रह्मोस क्षेपणास्त्राची क्षमता ही भारताच्या प्रगत लष्करी क्षमतेचा पुरावा आहे. चिनी हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्रे भारताच्या प्रणालींच्या तुलनेत कमी दर्जाची आहेत. भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र चिनी आणि पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणालींना भेदण्यात सक्षम होते. भारताचा संदेश स्पष्ट होता की ते पाकिस्तानात कधीही कुठेही मारा करू शकतात, असे स्पेन्सर म्हणाले.

हे ही वाचा : 

पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले

ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाख मिळवा!

चकमकीपूर्वी दहशतवाद्याला आईचा व्हिडीओ कॉल, म्हणाली “बेटा, शरण जा”

इस्लामाबादने भारतीय लष्करी सुविधांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केल्यानंतर १० मे रोजी भारताने पाकिस्तानमधील ११ हवाई तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांसाठी ब्रह्मोस क्षेपणास्त्र वापरण्यात आले. शिवाय, जेव्हा भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा त्यांनी पाकिस्तान वापरत असेल्या चिनी हवाई संरक्षण प्रणालींना यशस्वीरित्या बायपास करून पाकिस्तानच्या आत दहशतवादी तळांवर हल्ला केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा