पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध गरळ ओकण्याचे काम केले आहे. समा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, भारतासोबत युद्धाची शक्यता आहे. तसेच त्यांनी भारताबद्दल प्रक्षोभक विधानेही केली आहेत. आसिफ म्हणाले की, मला तणाव वाढवायचा नाही, पण धोके खरे आहेत आणि ते नाकारत नाही. जर युद्धाचा प्रश्न आला तर, पाकिस्तान पूर्वर्वीपेक्षा चांगले परिणाम साध्य करेल, असा दावा त्यांनी केला आहे.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, भारत कधीही एकसंध राष्ट्र नव्हता तसेच पाकिस्तानची निर्मिती अल्लाहच्या नावाने झाली होती. पुढे ते असेही म्हणाले की, पाकिस्तानी लोक अंतर्गत वाद घालतात, स्पर्धा करतात परंतु भारतासोबत संघर्ष झाल्यास एकत्र येतात. “इतिहास सांगतो की, औरंगजेबाचा काळ सोडल्यास भारत कधीही एकसंध राष्ट्र नव्हता. पाकिस्तानची निर्मिती अल्लाहच्या नावाने झाली आहे. घरी आपण वाद घालतो आणि स्पर्धा करतो पण, भारताविरुद्धच्या लढाईत आपण एकत्र येतो,” असे ख्वाजा आसिफ म्हणाले.
भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला जगाच्या नकाशावर अस्तित्वात राहायचे असेल तर राज्य पुरस्कृत दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवा असा कठोर इशारा दिला आहे. यानंतर आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची ही टिप्पणी आली आहे. भारत भविष्यात होणाऱ्या संघर्षात पूर्वीसारखा संयम दाखवणार नाही, अशी समजही भारतीय लष्कर प्रमुख जनरल यांनी पाकिस्तानला दिली होती.
हे ही वाचा..
आता कारागृहातही धर्मांतरण; बीडमधील कैद्यांचा आरोप
अराट्टई ऍपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लवकरच
लँड क्रूझर, डिफेंडर आणि मासेराती कारची बेकायदा आयात, ईडीची कारवाई
आयएमएफच्या माजी अर्थतज्ज्ञ म्हणतात, टॅरिफचा अमेरिकन अर्थव्यवस्थेला फायदा झालेला नाही!
ऑपरेशन सिंदूर ही जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने केलेली एक लष्करी कारवाई होती. या कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चे मुख्यालय आणि मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चा तळ यांचा समावेश आहे. शिवाय भारताच्या हवाई संरक्षण प्रणालींनी पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या रोखले.







