28 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरक्राईमनामाटीव्ही चॅनेलवर इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानी पत्रकाराची हत्या

टीव्ही चॅनेलवर इस्रायलला पाठिंबा दिल्याबद्दल पाकिस्तानी पत्रकाराची हत्या

चार मारेकऱ्यांना केली अटक

Google News Follow

Related

टेलिव्हिजन चॅनेलवर इस्रायलच्या समर्थनार्थ भाष्य करणाऱ्या कराचीमधील एका पत्रकाराची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. कट्टरपंथी इस्लामिक गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराची हत्या केल्याचे सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांनी सांगितले. पत्रकार इम्तियाज मीर यांची २१ सप्टेंबर रोजी कराचीच्या मालीर भागात टेलिव्हिजन चॅनेलच्या कार्यालयातून बाहेर पडताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

गृहमंत्री झियाउल हसन लांझर यांनी दावा केला की, मारेकऱ्यांनी पत्रकार मीरला इस्रायलचा कथित समर्थक मानले आणि त्यांच्या समर्थनार्थ केलेल्या टिप्पण्यांमुळे त्यांना लक्ष्य केले. सिंध पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) गुलाम नबी मेमन आणि शहर पोलिस प्रमुख जावेद आलम ओधो यांनी माध्यमांना सांगितले की अटक केलेल्या चारही जणांनी पाकिस्तानबाहेरील त्यांच्या हँडलरच्या आदेशावरून ही हत्या केल्याची कबुली दिली आहे.

कोणत्याही देशाचे नाव न घेता मेमन म्हणाले, अटक केलेले संशयित सुशिक्षित व्यक्ती असून त्यांचा नेता शेजारच्या देशात राहतो. अटक केलेल्या संशयितांची ओळख अजलाल झैदी, शहाब असगर, अहसान अब्बास आणि फराज अहमद अशी झाली आहे. बंदी घातलेल्या जैनबियून ब्रिगेडचा भाग असलेल्या लष्कर सारुल्लाहशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा : 

छठ पूजा सणादरम्यान देशभरात ५०,००० कोटींची उलाढाल

इंडीचा ढोंगीपणा; १२ राज्यात विरोध करत महाराष्ट्रात एसआयआरची मागणी

ब्राझिलियन महिलेच्या छेडछाड प्रकरणी ब्लिंकिट डिलिव्हरी एजंटला अटक

अवघ्या ११ महिन्यात विवाहितेचा मृत्यू; स्लो पॉइजन देऊन हत्या केल्याचा आरोप

त्यांनी सांगितले की तपासादरम्यान दोन संघीय गुप्तचर संस्थांनी कराची पोलिसांसोबत संयुक्तपणे काम केले होते आणि सर्व अटक केलेल्या संशयितांनी हत्येत आपला सहभागाची कबुली दिली होती. संशयितांपैकी एकाचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड देखील होता, असेही त्यांनी सांगितले. आयजीपी मेमन म्हणाले की, मालीर येथील कला बोर्ड येथील गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या गोळ्यांचे खोके अटक केलेल्या संशयितांच्या ताब्यातून जप्त केलेल्या पिस्तुलांशी जुळत होत्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा