अमेरिकेच्या अलास्का येथून एक विमान १० जणांसह बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी दुपारी अलास्कातील नोमजवळ बेरिंग एअरचे विमान १० जणांसह बेपत्ता झाले. अलास्कातील उनालाक्लीट शहरातून दुपारी २:३७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) उड्डाण केल्यानंतर दुपारी ३:१६ वाजता विमान रडारवरून अचानक गायब झाले. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडारच्या डेटावरून ही माहिती मिळाली आहे.
फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडारच्या आकडेवारीनुसार, नोमकडे जाणाऱ्या विमानाने गुरुवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३७ वाजता अलास्काच्या उनालाक्लीट शहरातून उड्डाण केले. साधारण ३९ मिनिटांनंतर हे विमान अचानक रडारवरून गायब झाले. सेस्ना २०८ बी ग्रँड कॅराव्हॅन विमानात पायलटसह दहा प्रवासी होते. शोध मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. नोम आणि व्हाइट माउंटनमधील स्थानिकांच्या मदतीने जमिनीवर शोध मोहीम राबवण्यात येत आहे. नोम स्वयंसेवक विभागाने स्थानिकांना हवामान आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव खाजगी शोध पथके तयार करू नयेत असे आवाहन केले आहे. दरम्यान, खराब हवामान आणि दृश्यमानतेमुळे हवाई शोध थांबवण्यात आला आहे.
हे ही वाचा :
प्रभू श्री राम मंदिराची पहिली वीट रचणारे कामेश्वर चौपाल यांचे निधन
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पाच वर्षानंतर रेपो दरात ०.२५ टक्के कपात!
महाकुंभात सहभागी होण्यापासून आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही
युनूस सरकार म्हणतं, मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यासाठी शेख हसीनाचं जबाबदार
अलास्कामध्ये डोंगराळ प्रदेश आणि बदलते हवामान आहे. येथील अनेक गावे रस्त्याने जोडलेली नाहीत, त्यामुळे लोक आणि वस्तूंची वाहतूक करण्यासाठी लहान विमानांचा वापर केला जातो. बेरिंग एअर ही अलास्कातील एक प्रादेशिक विमान कंपनी आहे जी सुमारे ३९ विमाने आणि हेलिकॉप्टर चालवते.







