29 C
Mumbai
Friday, August 21, 2026
घरदेश दुनियादहशतवादाविरोधात पोलंड भारतासोबत!

दहशतवादाविरोधात पोलंड भारतासोबत!

पोलंडच्या राजदूतांनी स्पष्ट केली भूमिका

Google News Follow

Related

भारत-पाकिस्तान संबंध आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर पोलंडने भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. “दहशतवादाविरोधात आम्ही भारतासोबत आहोत. दहशतवादी जिथे जातील, तिथे त्यांच्यावर कारवाई करण्याचा भारताला अधिकार आहे,” असे पोलंडचे भारतातील राजदूत डॉ. पिओत्र अँटनी श्विताल्स्की यांनी स्पष्ट केले. भारताच्या आत्म्याला लक्ष्य करणारे दहशतवादी हल्ले अत्यंत भीषण असल्याचे सांगत त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाही उल्लेख केला.

दहशतवादाच्या मुद्द्यावर पोलंडची भूमिका स्पष्ट असल्याचे राजदूतांनी सांगितले. “दहशतवादी जिथे जातील, तिथे त्यांचा पाठलाग करण्याच्या भारताच्या अधिकाराला आमचा पाठिंबा आहे,” असे त्यांनी म्हटले. पोलंड स्वतः दहशतवादाचा बळी ठरलेला देश असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतामध्ये, विशेषतः काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता पोलंडमध्ये घडलेल्या घटनांशी तुलना करता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. २०२५ मधील काश्मीरमधील दहशतवादी हल्ला अत्यंत भयंकर होता, असे त्यांनी सांगितले.

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना पोलंडच्या राजदूतांनी वैयक्तिक अनुभवही सांगितला. “मी गेल्या वर्षी ईस्टर काश्मीरमध्ये घालवला. दहशतवादी हल्ल्याच्या आदल्या रात्री मी श्रीनगरमधून निघालो होतो. दुसऱ्या दिवशीही तिथे जाण्याचे माझे नियोजन होते,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे काश्मीरमधील दहशतवादाचा मुद्दा आपल्यासाठी केवळ राजनैतिक विषय नसून वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

एफडीधारकांसाठी मोठी बातमी! आता व्याजदराची माहिती रोज मिळणार

भारत-मॉरिशसदरम्यान ५ वर्षांचा मोठा इंधन करार

ब्रिटन-युरोपच्या गुंतवणुकीला भारताचा ‘ग्रीन चॅनेल’

अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण

ऑपरेशन सिंदूरच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानच्या पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये पोलिश बनावटीच्या ड्रोनचा वापर झाल्याचे वृत्त समोर आल्याचा उल्लेख राजदूतांनी केला. भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांमधून अशा बातम्या आल्याचे त्यांनी सांगितले. काही पोलिश ड्रोन पाडण्यात आल्याचेही वृत्त होते. मात्र, हे ड्रोन प्रत्यक्ष हल्ल्यासाठी नव्हे, तर ‘डिकॉय’ म्हणजे शत्रूचे लक्ष विचलित करण्यासाठी वापरण्यात आले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे ड्रोन असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत-पोलंड संबंध, पाकिस्तानसोबतचे पोलंडचे संबंध आणि दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेला मिळणारा आंतरराष्ट्रीय पाठिंबा पुन्हा चर्चेत आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा