या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार वेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर करण्यात आला आहे. तानाशाहीविरोधातील शांततामय संघर्ष आणि लोकशाही हक्कांसाठीच्या प्रयत्नांमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर अमेरिकेच्या व्हाइट हाऊसनं नाराजी व्यक्त केली असून, नोबेल समितीवर राजकारणाला प्राधान्य देत असल्याचा आरोप केला आहे.
व्हाईट हाऊसच्या कम्युनिकेशन्स डायरेक्टरने एक्सवर पोस्ट केले की, “जरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या वर्षी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही, तरीही ते जगभरातील शांतता करारांमध्ये मध्यस्थी करत राहतील. त्यांच्याकडे मानवतेने भरलेले हृदय आहे. त्यांच्यासारखे कोणीही नाही. ते त्यांच्या इच्छाशक्तीने पर्वत हलवू शकतात.”
अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक देशांमधील संघर्ष संपवण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे आणि युद्धे संपवण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी ते काम करत राहतील. व्हाईट हाऊसच्या निवेदनात असेही म्हटले आहे की, “पुन्हा एकदा, नोबेल समितीने हे सिद्ध केले आहे की ते शांततेपेक्षा राजकारणाला प्राधान्य देते.”
हे ही वाचा :
अबब! काँग्रेस नेत्याच्या घरात सापडले ४० किलो सोने!
गाझामध्ये युद्धबंदी लागू, इस्रायली सैन्याची माघार सुरू!
आमीर खान मुत्तकी भारतात, ख्वाजा आसिफ म्हणतायत आम्ही रोज सैनिकांचे अत्यंसंस्कार करतोय…
दरम्यान, ट्रम्प यांच्या स्वप्नांना चकनाचूर करणाऱ्या माशाडो यांना देण्यात आलेल्या या वर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा आणि वाद दोन्ही निर्माण झाले आहेत. अनेक जण माशाडो यांच्या संघर्षाचे कौतुक करत असताना, व्हाईट हाऊस समितीवर टीका करत आहे, असे म्हणत आहे की नोबेल शांतता पुरस्कार निवड प्रक्रिया राजकीयदृष्ट्या प्रेरित झाली आहे.







