भारत आणि अमेरिका यांच्यात अतिरिक्त शुल्कावरून तणाव आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, नवी दिल्ली रशियाकडून तेल खरेदी थांबवेल. यावर भारताने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींकडे भारताकडून होत असलेल्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीबद्दल चिंता व्यक्त केली, ज्याच्यामुळे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धाला निधी मिळण्यास मदत होते असे वॉशिंग्टनचे मत आहे. भारत तेल खरेदी करत आहे याबद्दल मला आनंद नव्हता, असे ट्रम्प म्हणाले. यानंतर ते पुढे म्हणाले की, त्यांनी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) आज मला आश्वासन दिले की, ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत. हे एक मोठे पाऊल आहे. आता आपण चीनलाही तेच करायला लावणार आहोत. भारत रशियाकडून तेल आयात थांबवेल या ट्रम्प यांच्या दाव्याला नवी दिल्लीने पुष्टी दिलेली नाही.
हे ही वाचा..
अमृतसरमध्ये अवैध शस्त्र, ड्रग्जसह ३ तस्करांना अटक
चीनमध्ये धान्य खरेदीचे ९०% पेक्षा जास्त प्रमाण बाजारावर आधारित
एसटी बँकेत झाली हाणामारी, सदावर्ते-अडसूळांचे कार्यकर्ते भिडले
बिहार : भाजपची दुसरी यादी जाहीर; मैथिली ठाकूर ‘या’ मतदारसंघात लढणार
ट्रम्प म्हणाले की, नरेंद्र मोदींचे आश्वासन मिळवणे हे मॉस्कोच्या ऊर्जा उत्पन्नात कपात करण्याच्या त्यांच्या राजनैतिक प्रयत्नांचा एक भाग होता. आता आपल्याला चीनलाही तेच करायला लावावे लागेल, असे ते म्हणाले. बीजिंगवर दबाव आणणे हे गेल्या आठवड्यात मध्य पूर्वेत आपण जे केले त्या तुलनेत तुलनेने सोपे असेल. अमेरिकेच्या अध्यक्षांनी पुढे म्हटले की, भारताला रशियन तेलापासून दूर जाण्यास वेळ लागेल परंतु, ही प्रक्रिया लवकरच संपणार आहे, असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प म्हणाले की त्यांना विश्वास आहे की संघर्ष संपवण्याच्या दिशेने प्रगती शक्य आहे. रशियाचे तेल खरेदी थांबवण्याच्या भारताच्या निर्णयामुळे प्रयत्न सोपे होतील आणि युद्ध संपल्यानंतर सामान्य व्यापार संबंध पुन्हा सुरू होऊ शकतात.







