बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत मैथिली ठाकूर यांचेही नाव आहे. भाजपने त्यांना अलीनगरमधून तिकीट दिले आहे. या यादीत मुझफ्फरपूरमधून रंजन कुमार, छपरामधून छोटा कुमारी आणि बक्सरमधून आयपीएस आनंद मिश्रा यांच्यासह १२ उमेदवारांची नावे आहेत. भाजपने आतापर्यंत ८३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
भाजपने यापूर्वी पहिली यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये ७१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात १२ उमेदवारांची नावे आहेत. नुकेतच पक्षात प्रवेश केलेल्या मैथिली ठाकूरला पक्षाने अलीनगरमधून उमेदवारी दिली आहे. तर भाजपने कुसुम देवी यांचे तिकीट कापले, गोपाळगंजमधून सुभाष सिंह यांना तिकीट दिले आहे.
दरम्यान, २४३ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यात ही निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठी ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी आणि दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत.
हे ही वाचा :
गाझा शांतता शिखर परिषदेत ट्रम्प यांचे कौतुक करणारे शरीफ बनले टीकेचे धनी
अफगाणिस्तान सीमेवर हिंसाचार; मध्यस्थीसाठी पाकची धावाधाव
राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचा कार्यकारी संचालक लाच घेताना अडकला
बिहारमध्ये एनडीए बहुमताने सरकार स्थापन करेल
या निवडणुकीत भाजप १०१ जागा लढवत आहे. जेडीयू देखील १०१ जागा लढवत आहे. चिराग पासवान यांच्या पक्षाला २९ जागा तर उपेंद्र कुशवाहा आणि जितन राम मांझी यांच्या पक्षांना प्रत्येकी सहा जागा देण्यात आल्या आहेत.