अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासन आल्यापासून त्यांनी अनेक देशांशी व्यापार युद्ध छेडले आहे. चीनला त्यांनी लक्ष्य केले होते, दर्माय्न चीनसोबतच्या व्यापार युद्धाला काहीशी स्थगिती मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी भारतासंबंधी व्यापार शुल्कावर भाष्य केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दावा केला की, नवी दिल्लीने वॉशिंग्टन डीसीला एक करार करण्याची ऑफर दिली आहे त्यानुसार ते अमेरिकन वस्तूंवर कोणतेही शुल्क आकारणार नाही. ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळून लावला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवार, १५ मे रोजी प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की सध्या सुरू असलेल्या वाटाघाटी या गुंतागुंतीच्या आहेत आणि अंतिम स्वरूपापासून दूर आहेत. “भारत आणि अमेरिकेत व्यापार चर्चा सुरू आहेत. या गुंतागुंतीच्या वाटाघाटी आहेत. सर्वकाही होईपर्यंत काहीही अंतिम ठरवले जात नाही. कोणताही व्यापार करार हा परस्पर फायदेशीर असला पाहिजे; तो दोन्ही देशांसाठी काम करायला हवा. या व्यापार कराराकडून आमची हीच अपेक्षा असेल. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत त्यावर कोणताही निर्णय घेणे अकाली ठरेल,” असे स्पष्ट मत एस जयशंकर यांनी मांडले आहे.
कतारमधील एका व्यापारी मंचावरून बोलताना ट्रम्प यांनी भारताने अमेरिकेला शून्य शुल्कासह व्यापार कराराची ऑफर दिली आहे असे म्हटले होते. ट्रम्प यांच्या दाव्यानंतर लगेचच जयशंकर यांची ही टिप्पणी आली. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, नवी दिल्लीने वॉशिंग्टन डीसीला एक करार करण्याची ऑफर दिली आहे आणि ते अमेरिकन वस्तूंवर कोणतेही शुल्क आकारणार नाही असे म्हटले आहे. वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यात सुरू असलेल्या व्यापार चर्चेत प्रगती झाल्याचे त्यांनी संकेत दिले. यावर भारताने कोणतीही घोषणा केलेली नव्हती. त्यानंतर आता एस जयशंकर यांनी ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे.
हे ही वाचा :
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’चा भाग बनलेल्या आशुतोष राणा यांचा अनुभव काय ?
जहाजांसाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान जाणून घ्या!
युवकांची गुणवत्ता पाहून श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास झाला खुश!
ट्रम्प यांनी ऍपलला भारतात उत्पादन करू नका असे का सांगितले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या ९० दिवसांच्या कर सवलतीची मुदत संपण्यापूर्वी भारत अमेरिका व्यापार करार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वॉशिंग्टन भेटीनंतर भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चेला वेग आला, दोन्ही देश शरद ऋतूपर्यंत कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत होते. अशातच वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे चर्चा आणि वाटाघाटी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी १७ ते २० मे दरम्यान अमेरिकेला भेट देणार आहेत.







