भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीसाठी मध्यस्थी केल्याचा दावा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपल्या विधानावरून माघार घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, मी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर करण्यास मदत केली होती. आज (१५ मे) कतारची राजधानी दोहा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प बोलत होते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती खूपच तणावपूर्ण बनली होती आणि चर्चा क्षेपणास्त्रांच्या भाषेत होणार होती. म्हणूनच मी दोन्ही देशांशी बोलून परिस्थिती शांत केली. तथापि, त्यांनी असेही म्हटले की मला आशा आहे की मी येथून निघून गेल्यानंतरही मला येथे ऐकायला मिळेल की दोन्ही देश शांत आहेत.
ट्रम्प यांनी दावा केला की पाकिस्तान आणि भारत दोघेही ‘खूप आनंदी’ आहेत. आता दोघेही व्यवसायाबद्दल बोलत आहेत. पण याच संभाषणादरम्यान ते स्वतःही गोंधळलेले दिसले. यानंतर ते म्हणाले, “हे लोक १००० वर्षांपासून लढत आहेत, मला माहित नाही की मी हे सोडवू शकेन की नाही.” ही खूप कठीण बाब आहे.”
हे ही वाचा :
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाख मिळवा!
चकमकीपूर्वी दहशतवाद्याला आईचा व्हिडीओ कॉल, म्हणाली “बेटा, शरण जा”
सीमेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितचं!
खरे तर, भारत आणि पाक ‘युद्धबंदी’ची घोषणा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले होते. शनिवारी संध्याकाळी ५:३० वाजता त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर लिहिले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. त्यांनी दावा केला की रात्रभर चाललेल्या चर्चेत अमेरिकेने मध्यस्थी केली होती. “अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या ‘रात्रभर चाललेल्या चर्चे’नंतर हे घडले,” असे त्यांनी लिहिले. त्यांनी यासाठी भारत आणि पाकिस्तानचे अभिनंदन केले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘युद्धबंदी’च्या पोस्टनंतर भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली. मात्र, ट्रम्प यांच्या घोषणेला भारताने नकार दिला. या युद्धबंदीमध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका नसल्याचे भारत सरकारने म्हटले. भारत सरकारने स्पष्ट केले की, पाकिस्तान युद्धबंदीचा प्रस्ताव घेऊन आला होता.
