28 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरदेश दुनियागाझा शांतता शिखर परिषदेत ट्रम्प यांचे कौतुक करणारे शरीफ बनले टीकेचे धनी

गाझा शांतता शिखर परिषदेत ट्रम्प यांचे कौतुक करणारे शरीफ बनले टीकेचे धनी

शरीफ आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करताना थकत नसल्याचे चित्र दिसून आले

Google News Follow

Related

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे गाझा शांतता शिखर परिषदेला उपस्थित होते. या परिषदेमध्ये त्यांनी छोटे भाषण केले. मात्र, यानंतर शहबाज शरीफ हे टीकेचे धनी बनले आहेत. शरीफ हे आपल्या भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुक करताना थकत नसल्याचे चित्र दिसून आले. ट्रम्प यांच्या झालेल्या सातत्याच्या कौतुकामुळे अमेरिकेचे अध्यक्षही आश्चर्यचकित झाले होते. हाच विषय आता सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

गाझा शांतता शिखर परिषद ही गाझाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी अशी एक गंभीर शिखर परिषद होती. पण, शरीफ यांच्या भाषणानंतर या परिषदेचे रुपांतर हे एका व्यक्तीच्या कौतुक सोहळ्यात झाले. ट्रम्प यांनी शरीफ यांना “तुम्ही मला जे सांगितले ते बोलण्यासाठी या” असे आमंत्रित केले तेव्हा शरीफ यांनी आनंदाने होकार दिला. पुढे शरीफ यांनी पाच मिनिटांचे भाषण देऊन ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी सर्वात प्रामाणिक आणि सर्वात योग्य उमेदवार असल्याचे संबोधले.

शरीफ आपल्या भाषणात म्हणाले, आजचा दिवस महान दिवसांपैकी एक आहे कारण राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अथक प्रयत्नांनंतर शांतता प्राप्त झाली आहे. पुढे त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखण्याचे श्रेय ट्रम्प यांना दिले आणि घोषित केले की, जर हे गृहस्थ नसते तर युद्ध अशा पातळीवर वाढले असते की काय घडले हे सांगण्यासाठी कोणीही जिवंत राहिले नसते. यावर ट्रम्प यांनी त्या क्षणाचा आनंद घेत हसत हसत उत्तर दिले, “वा! मला हे अपेक्षित नव्हते. चला घरी जाऊया. मला आणखी काही सांगायचे नाही.”

शरीफ यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून शरीफ टीकेचे धनी ठरले आहेत. इतिहासकार अम्मार अली जान यांनी पोस्ट केली आहे की, “शहबाज शरीफ यांच्याकडून होत असलेले डोनाल्ड ट्रम्प यांचे सतत आणि अनावश्यक कौतुक जगभरातील पाकिस्तानी लोकांसाठी लाजिरवाणे आहे.” वापरकर्ता वसीम याने म्हटले आहे की, पाकिस्तानी राजकारणी इतके नीच का आहेत? निर्लज्ज माणूस शहबाज शरीफ. काही ब्राउनी पॉइंट्स मिळविण्यासाठी पॅलेस्टिनी संघर्षाचा वापर करत आहे. दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे, “जेव्हा बूट चाटण्याचा प्रश्न येतो तेव्हा कोणीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांची बरोबरी करू शकत नाही.

हे ही वाचा :

संभलमध्ये सार्वजनिक उद्यानाच्या जमिनीवर बांधलेल्या मशीदीवर बुलडोझर कारवाई

शस्त्रे सोडून संविधान हाती घेत भूपतीसह ६० नक्षलींचे आत्मसमर्पण

दिल्लीकरांनो हरित फटाकेच फोडा!

बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्रीपद सोडलं!

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते हम्माद अझहर यांनीही या वादात उडी घेतली आणि ते म्हणाले, “जगभरातून पाकिस्तानी लोकांना त्यांच्या नेत्यांच्या निवडीबद्दल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या वर्तनाबद्दल टोमणे मारताना पाहत आहे. पण, गोंधळ स्पष्ट करतो. तुम्ही जे विनोदी दृश्ये पाहत आहात त्यांना आम्ही पाकिस्तानी लोकांनी निवडून दिलेले नाही. आम्ही सर्वजण तुमच्या सर्वांइतकेच संतापलेले आहोत.”

आणखी एका वापरकर्त्याने म्हटले की, जर चोरीसाठी बक्षीस असेल तर शरीफ ते मिळवण्यास पात्र असतील. “ट्रम्प यांच्याबद्दल खात्री नाही, पण जर चोरीसाठी नोबेल पुरस्कार असेल तर शाहबाज शरीफ हे त्याचे सर्वात मोठे दावेदार आहेत,” असे ट्विट केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा