बांगलादेश सध्या मोठ्या राजकीय अस्थिरतेतून जात आहे, जिथे माजी पंतप्रधान शेख हसिना आणि हंगामी नेते मुहम्मद युनुस यांच्यात तणाव शिगेला पोहोचला आहे. शेख हसिना यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट करत मुहम्मद युनुस यांच्यावर अतिरेकी गटांच्या मदतीने आणि विशेषतः अमेरिकेच्या पाठिंब्याने सत्ता बळकावल्याचा आरोप केला. त्यांनी असा आरोप केला की, युनुस यांनी अनेक अतिरेक्यांना तुरुंगातून सोडले असून देशाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली आहे.
हसिना यांनी त्यांच्या पक्ष आवामी लीग वर लावलेली बंदी बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले आणि बांगलादेशातील लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे सांगितले. हसिना म्हणाल्या की, सेंट मार्टिन हे बेट अमेरिकेला देण्यासाठी आपले वडील तयार नव्हते पण त्यांना आपले प्राण द्यावे लागले. मात्र युनूस हे देशप्रेमाच्या आणाभाका घेत बांगलादेशच्या सत्तेत आले, मात्र ते सत्तेत आल्यावर बदलले. त्यांनी बांगलादेश विकण्याचे ठरवले आहे.
हसिना म्हणाल्या की, माझ्या मनात देश विकण्याचा कधी विचारही आला नाही. पण आज अशी स्थिती आली की, ज्या व्यक्तीवर लोक प्रेम करतात, पण ती व्यक्ती सत्तेत आल्यावर त्या व्यक्तीमध्ये कसा बदल झाला? युनूस यांनी ज्या दहशतवाद्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्या दहशतवाद्यांच्या मदतीने त्यांनी सत्ता हस्तगत केली.
नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारने आवामी लीग च्या सर्व राजकीय हालचालींवर बंदी घातली आणि पक्षाची निवडणूक आयोगात नोंदणीही रद्द केली. मानवाधिकार संघटना ह्युमन राइट्स वॉच ने या निर्णयावर टीका करत म्हटले की, यामुळे मूलभूत स्वातंत्र्यांना धोका पोहोचतो आणि हजारो समर्थकांचे हक्क हिरावले जात आहेत.
हे ही वाचा:
धर्म विचारून पर्यटकांना मारले नाही, म्हणणाऱ्यांचे दावे थरूर यांनी केले उद्ध्वस्त
विराट कोहली-अनुष्का शर्मा पोहोचले अयोध्येत, राम लल्लाचे घेतले दर्शन!
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष सदैव प्रेरणादायी
संशोधकांनी काय विकसित केलं बघा !
राजकीय अनिश्चितता आणि युनुस यांची भूमिका
मुहम्मद युनुस यांनी अलीकडेच निराशा व्यक्त करत राजीनाम्याचा विचार चालू असल्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, राजकीय पक्षांमध्ये सहमती न झाल्याने सुधारणा थांबल्या आहेत आणि जनतेचा संयम संपत चालला आहे. सध्या त्यांच्या सल्लागारांनी त्यांना पदावर राहण्यास सांगितले आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि लष्कर प्रमुख यांनी २०२५ च्या अखेरीस निवडणुका घेण्याची मागणी केली आहे, तर युनुस यांनी २०२६ पर्यंत विलंब करण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय चौकशी
यूके नॅशनल क्राइम एजन्सी ने दोन लंडनमधील मालमत्ता गोठविल्या आहेत, ज्या शेख हसीना यांचे माजी सल्लागार सलमान फ. रहमान यांचे पुत्र अहमद शायान फजलुर रहमान यांच्याशी संबंधित आहेत. या मालमत्ता कथित भ्रष्टाचार व निधी लंपटवण्याच्या तपासाचा भाग आहेत.







