28.2 C
Mumbai
Sunday, June 22, 2025
घरविशेषसंशोधकांनी काय विकसित केलं बघा !

संशोधकांनी काय विकसित केलं बघा !

Google News Follow

Related

अमेरिकेतील अभियंत्यांनी विशेष डिझाइन केलेल्या डेंटल फ्लॉसचा उपयोग करून एक साधा उपकरण विकसित केला आहे, जो तणाव निर्माण करणाऱ्या कोर्टिसोल नावाच्या हार्मोनचे मोजमाप करू शकतो. सततचा तणाव (क्रॉनिक स्ट्रेस) रक्तदाब, हृदयविकार वाढवतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो आणि डिप्रेशन व चिंतेसारख्या मानसिक आजारांचे कारण ठरतो. ‘एसीएस अप्लाइड मटेरियल्स अँड इंटरफेसेस’ या जर्नलमध्ये या अभ्यासाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. इलेक्ट्रिकल व संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक समीर सोनकुसळे यांनी या उपकरणाची माहिती दिली.
ते म्हणाले, “या संशोधनाची सुरुवात टफ्ट्स युनिव्हर्सिटीतील अनेक विभागांच्या सहयोगातून झाली. यात तणाव आणि अन्य मानसिक समस्यांचा शिकण्याच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, याची तपासणी करण्यात आली. त्यांनी पुढे सांगितले, “आम्हाला असे उपकरण हवे होते जे तणाव मोजण्याच्या प्रक्रियेत स्वतः तणावाचा स्रोत ठरू नये. म्हणून आम्ही विचार केला की दैनंदिन वापरात सहज समाविष्ट होईल असं सेन्सिंग डिव्हाईस तयार करता येईल का? कोर्टिसोल हा तणावाचा मार्कर लाळेमध्ये आढळतो, त्यामुळे फ्लॉसिंग म्हणजेच दातांमधील स्वच्छतेसाठी वापरली जाणारी दोरी वापरणं एक नैसर्गिक पर्याय वाटला.

हा लाळा-आधारित डेंटल फ्लॉस सामान्य फ्लॉस पिकसारखा दिसतो, ज्यामध्ये सपाट प्लास्टिक हँडलपासून दोन टोकदार दोऱ्या जोडलेल्या असतात. या फ्लॉसच्या माध्यमातून लाळ एका अतिशय बारीक चॅनेलमधून घेतली जाते. हा द्रव हँडल आणि संलग्न टॅबमध्ये खेचला जातो, जिथे तो कोर्टिसोल ओळखणाऱ्या इलेक्ट्रोडवर पसरतो. सुमारे ३० वर्षांपूर्वी विकसित झालेल्या ‘इलेक्ट्रोपॉलिमराइज्ड मॉलिक्युलरली इम्प्रिंटेड पॉलिमर’ (ईएमआयपी) या उल्लेखनीय तंत्रज्ञानाने इलेक्ट्रोड कोर्टिसोल ओळखतात.

हेही वाचा..

भारतीय सेनेच्या सन्मानार्थ ९० मीटरचा तिरंगा घेऊन यात्रा

‘मन की बात’मधील विचार वाराणसीकरांना प्रेरणादायक वाटला

संयुक्त राष्ट्रीय गिर्यारोहण पथकाने माउंट एव्हरेस्ट सर केलं

पाकिस्तान हा दहशतवादाचा नासूर

ईएमआयपी मोल्डचा वापर इतर विविध मार्गांनीही करता येऊ शकतो. लाळेमधील इतर अणू – जसे की प्रजननक्षमतेसाठी एस्ट्रोजेन, मधुमेहासाठी ग्लूकोज किंवा कर्करोगासाठी विशिष्ट मार्कर्स – ओळखण्यासाठीही अशा प्रकारचा डेंटल फ्लॉस सेन्सर विकसित करता येईल. संशोधक म्हणाले की, भविष्यात तणाव, हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांच्या अधिक अचूक निरीक्षणासाठी एकाच वेळी लाळेमधील अनेक बायोमार्कर्सचा शोध घेणंही शक्य होईल. कोर्टिसोल सेन्सरची अचूकता सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम सेन्सरच्या बरोबरीची आहे. हे उपकरण सामान्य नागरिक घरीच, कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय वापरू शकतात. सध्या, प्रा. सोनकुसळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या उत्पादनाच्या व्यावसायिक वापरासाठी एक स्टार्टअप सुरू करण्याची तयारी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
252,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा