31 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरदेश दुनियासुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?

सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?

Related

सध्या अभिनेता आर माधवन आनंदात आहे. याचे कारण म्हणजे त्याचा मुलगा वेदांत माधवन याने डॅनिश ओपन २०२२ मध्ये जलतरणात सुवर्णपदक पटकावले आहे.

आर माधवनच्या मुलाने वेदांतने ८०० मीटर जलतरण स्पर्धेत पदक जिंकले आणि ८:१७.२८ अशी वेळ नोंदवली आहे. माधवन याने याबद्दल एक क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये सत्कार समारंभात वेदांतच्या नावाची घोषणा केली जात आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लिप शेअर करत त्याने लिहिले, ” आज वेदांत माधवनने ८०० मीटरमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. भारावून गेलो आणि नम्र झालो.” पोस्टमध्ये त्यांनी वेदांतचे प्रशिक्षक, जलतरण महासंघ आणि संपूर्ण संघाचे आभारही मानले आहेत.

आर माधवनने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच इंडस्ट्रीतील लोक आणि चाहत्यांनी अभिनेत्याला कमेंट करून शुभेच्छा दिल्या आहेत. शनिवारी आर माधवनच्या मुलाने त्याच जलतरण स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, परंतु वेगळ्या प्रकारात. त्याने १ हजार ५०० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि १५:५७:८६ अशी वेळ घेतली आहे.

हे ही वाचा:

ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

आदित्य ठाकरे यांना पत्र; बेस्टच्या ‘चलो ऍप’मध्ये उर्दूचा पर्याय द्या!

राज ठाकरेंनी या विषयांवर केली पदाधिकाऱ्यांशी चर्चा

कांदिवलीनंतर चेंबूरमध्ये भाजपच्या पोल खोल अभियान रथाची तोडफोड

आर माधवन याचा मुलगा वेदांत याने अनेक आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. कांस्यपदकापासून सुवर्णपदकापर्यंत त्यांनी विविध श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. तर दुसरीकडे, आर माधवन ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, जो भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट १ जुलै २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,977चाहतेआवड दर्शवा
1,882अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा