24 C
Mumbai
Saturday, January 10, 2026
घरक्राईमनामासिडनीच्या न्यायालयाने हरयाणाच्या तरुणाला ठोठावली ४० वर्षांची शिक्षा

सिडनीच्या न्यायालयाने हरयाणाच्या तरुणाला ठोठावली ४० वर्षांची शिक्षा

कोरियन महिलांवर केले होते अत्याचार

Google News Follow

Related

हरियाणाच्या रेवाडीचा रहिवासी बालेश धनखड याला सिडनीच्या एका न्यायालयानं ४० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१७ मध्ये ५ कोरियन महिलांना नोकरीचं आमिष दाखवून इंटरव्यूच्या बहाण्यानं बोलावून, नशेचं औषध देऊन त्यांच्या सोबत लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर होते.

सिडनी डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश मायकेल किंग यांनी धनखडला शिक्षा सुनावताना सांगितलं की, आरोपीचं वर्तन पूर्वनियोजित, सुनियोजित, चलाखीने केलेले आणि अत्यंत हिंसक होतं. त्याचं वर्तन हे प्रत्येक पीडितेप्रति अनादर आणि अपमान करणारे होते

रेवाडीच्या सेक्टर-३ मधील राधा स्वामी कॉलनीचा रहिवासी बालेश धनखड २००६ मध्ये ऑस्ट्रेलियाला विद्यार्थी म्हणून गेला होता. शिक्षणानंतर त्यानं डेटा व्हिज्युअलायझेशन सल्लागार म्हणून अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं.
२०१८ मध्ये बालेश धनखडला अटक करण्यात आली होती. सिडनी सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट युनिटमध्ये पोलिसांनी छापा टाकून ड्रग्स आणि घड्याळ रेडिओच्या रूपात एक व्हिडिओ रेकॉर्डर देखील जप्त केला होता.

धनखडवर आरोप होते की, २०१७ मध्ये त्यानं ५ कोरियन महिलांना नोकरीचं आमिष दाखवून इंटरव्यूच्या बहाण्यानं बोलावलं आणि नशेचं औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये धनखडच्या अपार्टमेंटवर छापा टाकला तेव्हा लपवलेल्या कॅमेऱ्यांनी शूट केलेले अनेक व्हिडिओ आढळले. या व्हिडिओंमध्ये धनखड महिलांसोबत संबंध बनवतांना दिसत होता, काही महिला बेशुद्ध अवस्थेत दिसत होत्या.

हे ही वाचा:

स्वामी समर्थ श्रीसाठी राज्यातील दिग्गज रविवारी आमने सामने

पाच बांगलादेशी घुसखोर महिला ७ मुलांसह ताब्यात

दोन महिलांनी दाम्पत्यावर केला फरशीने हल्ला, गुन्हा दाखल

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महिलांकडे

धनखडनं खटला सुरू होताच कोर्टाकडून ‘सप्रेशन ऑर्डर’ घेतली होती, ज्यामुळे त्याच्याविरुद्ध बातम्या प्रकाशित करण्यावर बंदी होती. २०२३ मध्ये जेव्हा सप्रेशन ऑर्डर हटवण्यात आलं, तेव्हा उघड झालं की पोलिसांनी धनखडवर ५ कोरियन महिलांवर बलात्काराच्या प्रकरणात ३९ आरोप लावले होते. धनखडनं केलेले अपराध मान्य केले नव्हते. सिडनीच्या प्रतिष्ठित वकिलांनी त्याचा खटला लढवला. खटल्यादरम्यान अनेक तासांचे व्हिडिओ फुटेज सादर करण्यात आले, ज्यात धनखड महिलांसोबत लैंगिक संबंध बनवतांना दिसत होता.

सरकारी वकिलांच्या मते, धनखड केवळ कोरियन महिलांना लक्ष्य करत होता. तो स्थानिक सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स वेबसाइट गमट्रीवर कोरियन अनुवादकाच्या नोकरीचे विज्ञापन देत होता. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सिडनीच्या एका आलिशान हॉटेलमध्ये इंटरव्यूसाठी बोलावलं जात होतं. नंतर वेगवेगळ्या बहाण्यांनी त्या महिलांना आपल्या खोलीत नेऊन अत्याचार केले जात होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा