जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष महिला तक्रार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्त प्रत्येक पोलीस ठाणे आणि परिमंडळात आयोजित करण्यात आलेल्या महिला तक्रार निवारण दिनी १४७१ महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे,तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम आणि कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा पार पडला.
मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येते, या तक्रार निवारण दिनी तक्रारदाराच्या तक्रार अर्जाचे निवारण करण्यात येते. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी संपूर्ण मुंबईतील पोलीस ठाण्यात महिलांसाठी विशेष तक्रार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा:
सिडनीच्या न्यायालयाने हरयाणाच्या तरुणाला ठोठावली ४० वर्षांची शिक्षा
चॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडची पाकिस्तानमध्ये धमाल, दुबईत मात्र बेहाल
पाच बांगलादेशी घुसखोर महिला ७ मुलांसह ताब्यात
पुण्यात बीएमडब्लू रस्त्यात उभी करून मद्यधुंद तरुणांचे अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील ९४ पोलीस ठाणे तसेच परिमंडळ १३ परिमंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष महिला तक्रार निवारण दिनी १४७१ महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले, तसेच त्यात काही दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्याच बरोबर इतर अर्जावर पोलीस ठाणे स्तरावर निवारण करण्यात आले आहे.
या प्रसंगी विविध पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन निमित्ताने कर्तबगार महिलांचा उपस्थित पाहुण्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.या कार्यक्रमाव्दारे प्रत्येक पोलीस ठाण्यात उपस्थित महिलांना सुरक्षेबाबतचे धडे देण्यात आले आहे,तसेच आरोग्याबाबत मार्गदर्शन शिबीर, रक्तदान तपासणी शिबीर, अत्याचार व संरक्षण बाबत मार्गदर्शन, उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या माहिला अधिकारी आणि महिला अंमलदार यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.