28.9 C
Mumbai
Wednesday, November 4, 2026
घरदेश दुनियामध्यावधी निवडणुकात ट्रम्प यांनी गमावले अनेक बालेकिल्ले

मध्यावधी निवडणुकात ट्रम्प यांनी गमावले अनेक बालेकिल्ले

डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय; सिनेटवर बहुमतासह वर्चस्व

Google News Follow

इराणशी युद्ध, विविध देशांवर टारीफचे अस्त्र, कच्चे तेल घेण्यावर निर्बंध, सातत्याने आपल्या निर्णयात बदल, उलट सुलट विधाने या सगळ्या अनिश्चित परिस्थितीचा फटका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याना बसताना दिसत आहे. मध्यावधी निवडणुकात रिपब्लिकन पक्षाचे गड मानले जाणाऱ्या ठिकाणी डेमोक्रॅट्सनी ऐतिहासिक विजय मिळवले आहेत.

डेमोक्रॅट्सनी सिनेटमध्ये बहुमतापेक्षा मोठी आघाडी मिळवत विजय मिळवला असून, तब्बल सहा रिपब्लिकन राज्यांमध्ये विजय मिळवून त्यांनी सत्ता उलथवून टाकली आहे. हा दणदणीत विजय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चितच अत्यंत त्रासदायक बनवणार आहे. ८० वर्षीय रिपब्लिकन नेते ट्रम्प आणि त्यांच्या धोरणांना देशभरातून नाकारण्यात आल्याचे चित्र या लाटेतून दिसून आले आहे.

गेल्या अनेक दशकांत प्रथमच कॅन्सस, टेक्सास आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांनी डेमोक्रॅटिक सिनेटर्सची निवड केली आहे. कॅन्ससमध्ये पाद्री ऍडम हॅमिल्टन यांनी रिपब्लिकन रॉजर मार्शल यांचा पराभव करत डेमोक्रॅट्सना अनपेक्षित विजय मिळवून दिला. गेल्या ९४ वर्षांत प्रथमच डेमोक्रॅट्सना या राज्यात असा विजय मिळाला आहे. ओहायो आणि आयोवा ही आणखी दोन रिपब्लिकन राज्येही डेमोक्रॅट्सनी आपल्या बाजूने वळवली आहेत.

हे ही वाचा:

ऍड. गौरी भिडेंकडून वडिलांच्या उपचारांसाठी मदतीचे आवाहन

प्रदर्शनापूर्वीच ‘रामायण’ची २५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

पंजाबमध्ये पश्चिम बंगालची पुनरावृत्ती होईल काय?

वकिलांवरील हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

दरम्यान, डेमोक्रॅट्स प्रतिनिधीगृहातही मोठ्या विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. त्यांनी १४ राज्यांमध्ये विजय मिळवून, त्यातील जागा आपल्या बाजूने वळवत एकूण १९२ जागा जिंकल्या आहेत. सध्या त्यांच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांमध्ये ते आपली आघाडी कायम ठेवू शकले, तर डेमोक्रॅट्स अमेरिकन काँग्रेसवरही नियंत्रण मिळवतील.

वाढत्या महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. ट्रम्प यांची घसरती लोकप्रियता आणि इराण युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाला तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका बसला आहे. काँग्रेसवर नियंत्रण मिळवल्यास डेमोक्रॅट्सना ट्रम्प यांच्या अनेक विधेयकांना आणि कायदेविषयक योजनांना रोखण्याची ताकद मिळेल. तसेच त्यांना सुनावण्या घेणे, समन्स जारी करणे आणि चौकशीचे आदेश देण्याचे अधिकारही मिळतील. मात्र, ट्रम्प यांचा व्हेटो अधिकार आणि सिनेटमधील फिलिबस्टर प्रक्रियेमुळे हे काम तितके सोपे ठरणार नाही.

डेमोक्रॅट्सचा दणका

– नॉर्थ कॅरोलिनामध्ये विजय : सिनेट आणि प्रतिनिधीगृह या दोन्ही ठिकाणी नॉर्थ कॅरोलिनामध्ये जागा जिंकून डेमोक्रॅट्सनी पहिला मोठा विजय नोंदवला. रिपब्लिकन चक एडवर्ड्स यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या प्रतिनिधीगृहाच्या जागेवर डेमोक्रॅट जेमी एजर यांनी विजय मिळवला. तर सिनेटच्या निवडणुकीत रॉय कूपर यांनी मायकेल व्हॉटली यांचा पराभव केला. २००८ नंतर प्रथमच डेमोक्रॅट्सनी या राज्यातील सिनेटची जागा जिंकली आहे.

– न्यू जर्सीत यश : माजी नौदल हेलिकॉप्टर पायलट रेबेका बेनेट यांनी दोन वेळा निवडून आलेले रिपब्लिकन टॉम कीन ज्युनियर यांचा पराभव करून न्यू जर्सीतील प्रतिनिधीगृहाची जागा डेमोक्रॅट्सकडे खेचून आणली. गेल्या दोन मध्यावधी निवडणुकांमध्ये या जागेवर पक्ष बदल झाला असल्याने यंदाही ही जागा अत्यंत चुरशीची ठरणार होती.

– पेनसिल्व्हेनियामध्ये डेमोक्रॅट्सचा मोठा विजय : रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या पेनसिल्व्हेनियामध्ये बॉब ब्रुक्स यांनी विद्यमान रिपब्लिकन खासदार रायन मॅकेन्झी यांचा पराभव केला. कामगार वर्गातून आलेल्या ब्रुक्स यांनी आपल्या पार्श्वभूमीच्या आधारे मतदारांशी संपर्क साधला. वाढती महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती हा मतदारांसमोरील प्रमुख मुद्दा होता.

– दक्षिण कॅरोलिना आणि टेक्सासमध्ये ३० वर्षांनंतर

आणखी दोन रिपब्लिकन राज्यांनी डेमोक्रॅटिक सिनेटर्स निवडले. दक्षिण कॅरोलिनामध्ये अॅनी अँड्र्यूज यांनी डार्लिन ग्रॅहम यांचा पराभव केला. तर टेक्सासमध्ये जेम्स तालारिको यांनी रिपब्लिकन केन पॅक्स्टन यांना पराभूत करून सिनेटची जागा जिंकली.

– टेक्सासमध्ये डेमोक्रॅट्सना दुहेरी फायदा : टेक्सासमध्ये जीना हिनोजोसा यांनी राज्यपालपदाच्या निवडणुकीत विद्यमान राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांचा पराभव केला. १९९० नंतर प्रथमच टेक्सासमध्ये डेमोक्रॅटिक राज्यपाल निवडून आला आहे. तसेच हिनोजोसा या राज्यातील पहिल्या लॅटिना राज्यपाल ठरल्या आहेत. २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडून आलेले अॅबॉट चौथ्यांदा राज्यपालपद मिळवण्याच्या प्रयत्नात होते.

– कॅन्ससमध्ये डेमोक्रॅट्सचा ऐतिहासिक विजय : ऐतिहासिकदृष्ट्या रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या कॅन्ससमध्ये डेमोक्रॅट अॅडम हॅमिल्टन यांनी सिनेटची जागा जिंकून रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का दिला. जवळपास एका शतकानंतर प्रथमच या राज्यात डेमोक्रॅट्सची निळी लाट आली आहे. मेथोडिस्ट मेगाचर्चचे पाद्री असलेल्या हॅमिल्टन यांनी रिपब्लिकन रॉजर मार्शल यांचा पराभव केला. मार्शल दुसऱ्यांदा सिनेटवर निवडून येण्याच्या प्रयत्नात होते. ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या प्रचारासाठी राज्यात दोन वेळा सभा घेतल्या होत्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा