अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्या भारत भेटीमुळे पाकिस्तानची अस्वस्थता वाढली असून, आता त्याची तालिबानसोबत थेट झुंज सुरू झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने काबूलवर एअर स्ट्राईक (हवाई हल्ला) केला आणि त्यानंतर तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) ने प्रत्युत्तर म्हणून खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठा आत्मघाती हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने खैबर पख्तूनख्वाच्या डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला. हा हल्ला पाकिस्तानने काबूलवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत करण्यात आला, म्हणजेच तालिबानने लगेचच बदला घेतला. पाकिस्तानी माध्यमांच्या अहवालानुसार, या आत्मघाती हल्ल्यात किमान ५० पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, मात्र पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत फक्त ७ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
हेही वाचा..
आयईडी स्फोटात कोब्रा कमांडो जखमी
भारतातील सिल्व्हर ईटीएफ उच्च प्रीमियमवर करतात व्यापार
गुजरातमधील आंतरराष्ट्रीय खरेदीदार-विक्रेता बैठकीत किती झाले एमओयु
भारतातील शेतकऱ्यांचे भाग्य का बदलणार ?
एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, या हल्ल्यात ७ जवान मारले गेले आणि १३ जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी जड शस्त्रास्त्रांसह घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानी सैन्याने सर्व दहशतवाद्यांना ठार केले, असेही सांगण्यात आले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी तहरीक-ए-तालिबानला इशारा दिला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, परराष्ट्र मंत्रालयाने टीटीपीविरोधात टार्गेटेड ऑपरेशन्स सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
प्रेस ब्रीफिंगदरम्यान त्यांनी म्हटले, “पाकिस्तानची सुरक्षा दलं आणि कायदा अंमलबजावणी संस्था सीमावर्ती भागांतील नागरिकांना दहशतवादी धोके, विशेषतः ‘फितना-अल-ख्वारिज’ आणि ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP)’ सारख्या संघटनांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अचूक आणि लक्ष्यित मोहीमा राबवत आहेत. या सर्व कारवाया गुप्तचर माहितीच्या आधारे केल्या जात आहेत.”
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांना चेतावणी दिली आहे की, पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी त्यांच्या भूमीचा लॉन्चपॅड म्हणून वापर होऊ देऊ नये. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की टीटीपीसारख्या संघटना या संपूर्ण प्रदेशाच्या शांतता आणि स्थैर्यासाठी समान धोका आहेत. त्यांच्या नेटवर्कचा नाश करण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी एकसंध प्रयत्नांची आवश्यकता आहे.







