पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, गेल्या ११ वर्षांत भारताचा कृषी निर्यात जवळपास दुप्पट झाला आहे. धान्य उत्पादनात ९०० लाख मेट्रिक टनांची वाढ झाली असून फळे आणि भाजीपाला उत्पादनात ६४० लाख मेट्रिक टनांहून अधिक वाढ झाली आहे. नवी दिल्लीतील इंडियन अॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट (IARI) येथे आयोजित विशेष कृषी कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी दोन नवी योजना — ‘पंतप्रधान धन धान्य कृषी योजना’ आणि ‘डाळी आत्मनिर्भरता मिशन’ — यांचा शुभारंभ केला. त्यांनी सांगितले की या दोन योजना भारतातील शेतकऱ्यांचे भाग्य बदलविण्याचे काम करतील.
मोदी म्हणाले की या योजनांवर केंद्र सरकार ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले, “शेती आणि शेतकरी हे नेहमीच आपल्या विकास प्रवासाचा एक अविभाज्य भाग राहिले आहेत. बदलत्या काळानुसार शेतीला आणि शेतकऱ्यांना सरकारकडून सातत्याने पाठबळ मिळणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “बियाण्यांपासून बाजारापर्यंत अनेक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम असा की आज दूध उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा मासळी उत्पादक देश आहे. देशातील मध उत्पादन 2014च्या तुलनेत दुप्पट झाले आहे. देशात ६ मोठ्या खत कारखान्यांची उभारणी करण्यात आली आहे. २५ कोटींहून अधिक माती आरोग्य पत्रिका (Soil Health Cards) शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सूक्ष्म सिंचनाची सुविधा १०० लाख हेक्टर क्षेत्रात पोहोचली आहे. ‘पीएम पिक विमा योजने’अंतर्गत सुमारे २ लाख कोटी रुपये दाव्यांच्या रूपाने शेतकऱ्यांना मिळाले आहेत. गेल्या ११ वर्षांत १० हजारांहून अधिक शेतकरी उत्पादक संघ (FPO) स्थापन झाले आहेत.”
हेही वाचा..
प. बंगालमध्ये आर.जी. कर घटनेची पुनरावृत्ती; रुग्णालयाच्या आवारात विद्यार्थिनीवर बलात्कार
आयपीएस वाय पूरन कुमार आत्महत्या प्रकरणी रोहतकचे पोलीस अधीक्षक बडतर्फ
“एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांचे उड्डाण बंद करा”
“भारत अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी तळ म्हणून करतोय” पाक लेफ्टनंट जनरल बरळले
मोदी यांनी सांगितले की कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी अनेक शेतकरी आणि मच्छीमार यांच्याशी संवाद साधला. तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचे अनुभव ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. पंतप्रधान म्हणाले की गेल्या ११ वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी अनेक यशस्वी अनुभव घेतले आहेत. ते पुढे म्हणाले, “आपल्याला विकसित भारत बनायचे असेल तर प्रत्येक क्षेत्रात सातत्याने प्रगती करावी लागेल, सुधारणा करत राहाव्या लागतील. हीच विचारसरणी ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’मागे आहे. या योजनेची प्रेरणा ‘आकांक्षी जिल्हा योजना’च्या यशातून मिळाली आहे.”
आकांक्षी जिल्ह्यांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, “जेव्हा वंचितांना प्राधान्य आणि मागासांना अग्रक्रम मिळतो, तेव्हा परिणामही उत्कृष्ट दिसतात. आज आकांक्षी जिल्ह्यांमध्ये माता मृत्यू दर कमी झाला आहे, बालकांचे आरोग्य आणि शिक्षण सुधारले आहे. अनेक निर्देशकांमध्ये हे जिल्हे आता इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक चांगले कामगिरी करत आहेत.”







