भारतीय पायलट संघाने (Federation of Indian Pilots) नागरिक उड्डाण मंत्रालयाला (Ministry of Civil Aviation) एक पत्र लिहिले आहे. या पत्रात, त्यांनी एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांचे उड्डाण बंद करण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राम मोहन नायडू यांना लिहिलेल्या पत्रात भारतीय पायलट संघाने एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमानांचे उड्डाण बंद करण्याची विनंती केली आहे. तांत्रिक बिघाड आणि देखभाल दुरुस्तीशी संबंधित काही समस्यांमुळे सर्व एअर इंडियाच्या बोइंग ७८७ विमानांची उड्डाणे तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात DGCA ने नुकतेच विशेष ऑडिट सुरू केले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या पत्रात बोईंग ७८७ विमानातील दोन अलीकडील बिघाडांचाही उल्लेख करण्यात आला आहे, ज्यात तांत्रिक समस्या आल्या होत्या. तसेच देशातील सर्व बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानांची सखोल तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, विशेषतः विद्युत यंत्रणेत काही दोष आहेत का हे तपासण्यासाठी.
हे ही वाचा :
“भारत अफगाणिस्तानचा वापर दहशतवादी तळ म्हणून करतोय” पाक लेफ्टनंट जनरल बरळले
मुत्ताकी यांच्या पत्रकार परिषदेतून महिला पत्रकारांना वगळण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटले?
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली राजस्थानातील एकाला अटक!
ट्रम्प यांचा चीनला दणका; आयातीवर १०० टक्के अतिरिक्त कर
वैमानिकांच्या संघटनेने उड्डाण सुरक्षा संचालनालय (FSD), हवाई सुरक्षा आणि DGCA च्या हवाई योग्यतेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एअर इंडियाचे विशेष ऑडिट करण्याची विनंती केली आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडिया १७१ विमानाच्या भीषण अपघातानंतर काही महिन्यांनी हे पत्र आले आहे. या घटनेत विमानातील २४१ आणि जमिनीवर १९ प्रवाशांचा मृत्यू झाला. एआय-१७१ च्या अपघातानंतर, एअर इंडियाच्या विमानात अनेक बिघाड झाले आहेत, असे पत्रात म्हटले आहे. वैमानिकांच्या समितीने ९ ऑक्टोबर रोजी व्हिएन्नाहून दिल्लीला जाणाऱ्या AI-१५४ फ्लाइटचाही उल्लेख केला, ज्यामध्ये अनेक बिघाड झाले आणि ते दुबईला वाळवावे लागले.







