भारतातील सिल्व्हर एक्सचेंज-ट्रेडेड फंड्स (ETFs) सध्या सणासुदीच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे आणि जागतिक स्तरावर मर्यादित भौतिक पुरवठ्यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्कच्या तुलनेत मोठ्या प्रीमियमवर व्यवहार करत आहेत, असे शनिवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद केले आहे. अॅक्सिस म्युच्युअल फंडच्या अहवालानुसार, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत चांदी-आधारित उत्पादनांमध्ये गुंतवणुकीचा प्रवाह जागतिक स्तरावर विक्रमी पातळीवर पोहोचला — सुमारे ९५ दशलक्ष औंस इतकी वाढ झाली, जी मागील संपूर्ण वर्षातील एकूण गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, यामुळे २०२५ च्या मध्यावधीपर्यंत एकूण ईटीएफ होल्डिंग्ज १.१३ अब्ज औंस (सुमारे ४० अब्ज अमेरिकन डॉलर्स) इतक्या झाल्या आहेत. जागतिक खाण उत्पादनात थोडी वाढ दिसून येत आहे आणि ते २०२६ पर्यंत सर्वोच्च पातळीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान औद्योगिक आणि गुंतवणुकीची मागणी वाढत आहे, जी सौर फोटोव्होल्टाइक, इलेक्ट्रिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, ५ G इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेमीकंडक्टर उद्योग यांच्या वाढीमुळे चालवली जात आहे.
हेही वाचा..
गुजरातमधील आंतरराष्ट्रीय खरेदीदार-विक्रेता बैठकीत किती झाले एमओयु
भारतातील शेतकऱ्यांचे भाग्य का बदलणार ?
प. बंगालमध्ये आर.जी. कर घटनेची पुनरावृत्ती; रुग्णालयाच्या आवारात विद्यार्थिनीवर बलात्कार
आयपीएस वाय पूरन कुमार आत्महत्या प्रकरणी रोहतकचे पोलीस अधीक्षक बडतर्फ
सौदी अरेबियाच्या केंद्रीय बँकेने अलीकडे केलेल्या चांदी खरेदीमुळे, जागतिक पातळीवर केंद्रीय बँकांमध्ये चांदीबद्दलची वाढती रुची स्पष्ट झाली असून त्यामुळे मागणीत लक्षणीय बदल दिसत आहे. दरम्यान, भारतात सणासुदीच्या काळात चांदीची भौतिक मागणी अत्यंत मजबूत राहिली आहे. खरेदीदारांनी चांदीचे नाणे, बार, दागिने आणि मूर्ती यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे. सप्टेंबर महिन्यात भारताचा चांदी आयात आकडा मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट झाला आहे, कारण सराफ व्यापारी आणि जौहरी विक्रमी उच्च किमती असूनही आपला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत.
अॅक्सिस म्युच्युअल फंडने सांगितले की ही कमतरता आता ईटीएफ बाजारातही दिसत आहे. सामान्य परिस्थितीत भारतीय आणि जागतिक किमतींमधील फरक अत्यल्प असतो आणि आर्बिट्राज व्यवहारांमुळे तो लवकर मिटतो. परंतु सध्याच्या परिस्थितीत भौतिक चांदीच्या कमतरतेमुळे हा प्रीमियम कायम राहिला आहे आणि ईटीएफ आर्बिट्राजरदेखील हा फरक मिटवू शकलेले नाहीत. अॅक्सिस एमएफने इशारा दिला आहे की, जर पुरवठा सामान्य झाला आणि देशांतर्गत प्रीमियम कमी झाला, तर सध्या वाढलेल्या प्रवेश किमतींमुळे एनएव्ही (नेट अॅसेट व्हॅल्यू) मध्ये घसरणीचा धोका निर्माण होऊ शकतो. फंड हाऊसनुसार, मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांदी हा एक धोरणात्मक विविधीकरण आणि संरक्षणाचा साधन म्हणून पाहिला जात आहे.







