29 C
Mumbai
Friday, September 25, 2026
घरदेश दुनियातणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराणमध्ये तीन तास चर्चा

तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इराणमध्ये तीन तास चर्चा

होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणच्या अटी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील संघर्ष अद्याप कायम आहे. याच दरम्यान एक सकारात्मक बाब समोर आली आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्कमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या चर्चेला दुजोरा देत बैठक ‘चांगली’ आणि ‘अत्यंत सकारात्मक’ झाल्याचे सांगितले.

ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना अमेरिकेच्या अधिकाऱ्यांची इराणच्या प्रतिनिधींसोबत तीन तास बैठक झाल्याचे सांगितले. या चर्चेतून करार होणे इराणच्याच हिताचे असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांचा चर्चेत सहभाग असल्याचे ट्रम्प यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

महानदीतल्या खोल विहीरीत सापडला नैसर्गिक वायू

अमेरिकन जवानांनी बद्रीनाथ मंदिरासह जुनागढ किल्ल्याला दिली भेट

महाराष्ट्रासह चार राज्यांत विधान परिषद निवडणुकीचा बिगुल

दुष्काळी परिस्थितीच्या आढाव्यासाठी सरकारची उपसमिती

या बैठकीत इराणने सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी आपल्या अटी अमेरिकेसमोर मांडल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी सांगितले. त्यामध्ये इराणवरील नौदल नाकेबंदी तातडीने हटवणे, गोठवलेली इराणी मालमत्ता परत करणे आणि विविध आघाड्यांवरील युद्ध थांबवणे या मागण्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, इराणसोबत कोणत्याही संभाव्य करारासाठी अण्वस्त्रांचा मुद्दा अमेरिकेसाठी महत्त्वाचा असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. इराणला अण्वस्त्र मिळू देता येणार नाही, अशी भूमिका त्यांनी पुन्हा मांडली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमुळे अमेरिका आणि इराणचे वरिष्ठ प्रतिनिधी एकाच ठिकाणी आले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये थेट किंवा मध्यस्थांमार्फत चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी न्यूयॉर्कमधील बैठका महत्त्वाच्या ठरू शकतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा