34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
घरदेश दुनियानेतान्याहू म्हणतात, “युद्ध सर्वोच्च बिंदूवर”

नेतान्याहू म्हणतात, “युद्ध सर्वोच्च बिंदूवर”

इस्रायल आणि गाझा पट्टीतील दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू

Google News Follow

Related

गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि गाझा पट्टीतील दहशतवादी संघटना हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाची तीव्रता अधिक वाढत असून इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीतील हमासच्या तळांवर हल्ले चालूच ठेवले आहेत. गेल्या अडीच महिन्यांत या युद्धात इस्रायलचे १ हजार २०० नागरिक आणि सैनिक मारले गेले आहेत. तर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २१ हजारहून जास्त पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत. अशातच इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी केलेल्या विधानामुळे चिंता अधिकच वाढली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा पट्टीतील हमासवरच्या हल्ल्यांबाबत भूमिका मांडली आहे. “आता युद्ध सर्वोच्च बिंदूवर पोहोचलं आहे” असं नेतान्याहू म्हणाले आहेत. त्याशिवाय इजिप्त आणि गाझापट्टीदरम्यानचा फिलाडेल्फिया कॉरिडॉर इस्रायलयच्या ताब्यात असायला हवा, अशी भूमिका नेतान्याहू यांनी यावेळी मांडली. त्यामुळे जवळपास संपूर्ण गाझापट्टीत हल्ले केल्यानंतर आता दोन्ही देशांच्या सीमा भागातील हा पूर्ण पट्टा आपल्या ताब्यात घेण्याच्या दिशेनं इस्रायलच्या सैन्यानं आगेकूच केल्याचं दिसून येत आहे. “हा कॉरिडॉर पूर्णपणे बंदच व्हायला हवा. त्याशिवाय आपल्याला या भागात अपेक्षित असलेलं निर्लष्करीकरण साध्य होणं अशक्य आहे”, असंही नेतान्याहू यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

सावधान! राम मंदिराच्या नावाने क्यू-आर कोड पाठवून उकळतायत पैसे

जम्मू-काश्मीरची ‘तहरीक-ए-हुर्रियत’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

म्यानमार मधून मिझोराममध्ये पोहचलेल्या १५१ सैनिकांना भारताचा आधार!

जयंत पाटील भाजपाबरोबर येणार असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता

२००५ साली झालेल्या करानानुसार इस्रायलयनं गाझा पट्टीतून आपलं सैन्य माघारी घेतलं होतं. तेव्हापासून या भागात हमासचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र, आता इस्रायलनं पूर्ण गाझा पट्टीतून हमासला हद्दपार करण्याची भाषा सुरू केल्यामुळे हे थेट २००५ च्या कराराचं उल्लंघन ठरेल, असं बोललं जात आहे. याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमके कसे पडसाद उमटणार, यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा