27 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरदेश दुनिया“कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात केले होते का?” बालकांच्या मृत्यूनंतर WHO चा...

“कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात केले होते का?” बालकांच्या मृत्यूनंतर WHO चा सवाल

कोल्ड्रिफ कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या स्रेसन फार्मास्युटिकल्सच्या मालकाला अटक

Google News Follow

Related

कफ सिरप प्यायल्यामुळे देशभरात २२ बालकांचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत असताना आता या प्रकरणात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) उडी घेतली आहे. संबंधित कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आले होते का, असा सवाल जागतिक आरोग्य संघटनेने उपस्थित केला आहे.

कोल्ड्रिफ या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल (DEG) आणि इथिलीन ग्लायकोल (EG) असे विषारी पदार्थ असल्याचे आढळून आले. या सिरपचे सेवन केल्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेशातील बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरात खळबळ उडाली. देशभरात या सिरपवर बंदी आणल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने भारतीय अधिकाऱ्यांना विचारले आहे की, संबंधित कफ सिरप इतर देशांमध्ये निर्यात करण्यात आले होते का? भारतीय अधिकाऱ्यांकडून अधिकृत प्रतिसाद मिळाल्यानंतर WHO जागतिक वैद्यकीय उत्पादनांचा इशारा जारी करण्याचा निर्णय घेईल. ही संस्था देशांना निकृष्ट किंवा दूषित औषधांबद्दल चेतावणी देण्यासाठी असे अलर्ट जारी करते.

माहितीनुसार, मध्य प्रदेशात या सिरपचे सेवन केल्यानंतर बालकांचा मृत्यू झाला आहे, तर इतर पाच जणांना किडनीच्या संसर्गाने गंभीर दुखापत झाली आहे. राजस्थानमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतात मुलांच्या मृत्यूशी संबंधित कफ सिरप नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून इतर देशांमध्ये निर्यात केला जात होता का, याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण मागितले आहे.

हे ही वाचा:

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सदस्यत्व रद्द

पुण्यातील कोंढवामध्ये एटीएसकडून सर्च ऑपरेशन; चौकशीसाठी संशयित ताब्यात

भारतासोबतचे संबंध त्वरित सुधारा!

शांतता प्रस्तावाच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल- हमास सहमत; काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

दरम्यान, कोल्ड्रिफ कफ सिरपची निर्मिती करणाऱ्या स्रेसन फार्मास्युटिकल्सच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, मालक रंगनाथन याला बुधवारी रात्री चेन्नई येथे अटक करण्यात आली. तामिळनाडू ड्रग्ज कंट्रोल डिपार्टमेंटच्या २६ पानांच्या अहवालात कान्सेपुरा येथील फार्मा कारखान्यात कफ सिरपची निर्मिती अस्वच्छ परिस्थितीत झाली होती हे उघड झाले. राज्य नियामक संस्थेने नोंदवलेल्या ३५० उल्लंघनांमध्ये गंजलेली उपकरणे आणि नॉन-फार्मा-ग्रेड रसायनांचा बेकायदेशीर वापर यांचा समावेश होता. तामिळनाडू नियामक संस्थेने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की परवानगीयोग्य मर्यादा फक्त ०.१ टक्के असतानाही ४८ टक्क्यांपर्यंत औद्योगिक द्रव मिसळण्यात आला होता. चांगल्या उत्पादन पद्धती (GMP) प्रमाणपत्राचा अभाव असूनही, रंगनाथन यांच्या कंपनीने जेनेरिक औषधाचे उत्पादन आणि विक्री सुरूच ठेवली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा