रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून यावर तोडगा काढण्यात अद्याप यश आलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेताच या दोन देशांमध्ये शांततेत चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, अशाच एका चर्चेवेळी ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनची सर्व लष्करी मदत स्थगित केली होती. दरम्यान, आता झेलेन्स्की यांनी मोठा निर्णय घेत म्हटले आहे की, रशियाशी युद्ध सुरू असताना शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहेत. ट्रम्प यांनी लष्करी मदत थांबवताच काही तासांतच झेलेन्स्की यांनी हा निर्णय घेतला आहे.
झेलेन्स्की यांनी ट्वीट करत या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. “आपल्यापैकी कोणालाही अंतहीन युद्ध नको आहे. युक्रेन कायमस्वरूपी शांतता जवळ प्रस्थापित करण्यासाठी शक्य तितक्या लवकर वाटाघाटीच्या टेबलावर येण्यास तयार आहे. युक्रेनियन लोकांपेक्षा जास्त कोणालाही शांती नको आहे. मी आणि माझी टीम कायमस्वरूपी शांतता मिळविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहोत,” असे झेलेन्स्की यांनी ट्विट केले आहे.
“आम्ही युद्ध संपवण्यासाठी जलद गतीने काम करण्यास तयार आहोत. यात पहिले टप्पे म्हणजे कैद्यांची सुटका आणि आकाशात युद्धविराम. क्षेपणास्त्रांवर, लांब पल्ल्याच्या ड्रोनवर, न्युक्लिअर प्लांट आणि आणि इतर नागरी पायाभूत सुविधांवर बॉम्ब टाकण्यास बंदी. आम्हाला पुढील सर्व टप्प्यांतून खूप वेगाने पुढे जायचे आहे आणि एक मजबूत अंतिम करार करण्यासाठी अमेरिकेसोबत काम करायचे आहे,” असे युक्रेनचे झेलेन्स्की म्हणाले.
I would like to reiterate Ukraine’s commitment to peace.
None of us wants an endless war. Ukraine is ready to come to the negotiating table as soon as possible to bring lasting peace closer. Nobody wants peace more than Ukrainians. My team and I stand ready to work under…
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) March 4, 2025
युक्रेनचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी अमेरिकेने किती मदत केली आहे याचे आम्हाला खरोखरच महत्त्व आहे. याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असं झेलेन्स्की म्हणाले. पुढे ते म्हणाले की, वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसमध्ये शुक्रवारी आमची बैठक व्हायला हवी होती तशी झाली नाही. असा प्रकार घडला हे खेदजनक आहे. गोष्टी बरोबर करण्याची वेळ आली आहे. भविष्यातील सहकार्य आणि संवाद रचनात्मक असावे अशी आमची इच्छा आहे. खनिजे आणि सुरक्षेबाबतच्या कराराबद्दल, युक्रेन कोणत्याही वेळी आणि कोणत्याही सोयीस्कर स्वरूपात त्यावर स्वाक्षरी करण्यास तयार आहे. आम्ही हा करार अधिक सुरक्षितता आणि ठोस सुरक्षा हमींच्या दिशेने एक पाऊल म्हणून पाहतो.
हे ही वाचा :
बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक!
‘फिट इंडिया मीट’मधून तळागाळातील खेळाडूंना पारखण्याची संधी!
संभलमधील जामा मशीद ‘विवादित स्थळ’
हाकलेपर्यंत मुंडे यांनी वाट पाहिली…
सोमवारी, ट्रम्प प्रशासनाने झेलेन्स्की यांना रशियासोबतचे युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यासाठी दबाव आणण्याच्या प्रयत्नात युक्रेनचे सर्व लष्करी मदत थांबवली होती. तसेच जोपर्यंत युक्रेन शांतता आणि वाटाघाटीसाठी वचनबद्धता दाखवत नाही तोपर्यंत ही बंदी लागू असेल असं व्हाईट हाऊसने स्पष्ट केले होते.