26 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरदेश दुनियाझोमॅटोच्या ट्विटने लागली पाकिस्तानला मिरची

झोमॅटोच्या ट्विटने लागली पाकिस्तानला मिरची

Related

झोमॅटो या खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी प्रसिद्ध कंपनीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या आधीच आपल्या ट्विटने मैदानाबाहेर षटकार मारला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान ह्या दोन संघांमध्ये होऊ घातलेल्या टी -२० सामन्याला झोमॅटोने चांगलाच तडका दिला आहे. झोमॅटोने केलेल्या या चुरचुरीत ट्विटमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाला आणि त्यांच्या चाहत्यांना चांगलीच मिरची लागली आहे.

झोमॅटोच्या या ट्विटला २०१९ च्या विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची पार्श्वभूमी आहे. २०१९ च्या विश्वचषकात रंगलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. यावेळी सामन्यानंतर एका पाकिस्तानी समर्थकांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया खूपच व्हायरल झाली होती. हा एक प्रकारचा कॉमेडी व्हिडिओ होता.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये का सुरु आहेत दंगली?

इस्लामचा त्याग करून इंडोनेशियाच्या राजपुत्री करणार हिंदुधर्मात प्रवेश! वाचा सविस्तर…

मुस्लिम समाजातील काही लोक का टाळत आहेत लसीकरण?

मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!

या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी संघाचा समर्थक माध्यमांमध्ये आपल्या संघाला नावं ठेवताना दिसत होता. पाकिस्तानी खेळाडूंना फिटनेसची चिंता नाही असा त्याचा सूर होता. मॅचच्या आदल्या रात्री पाकिस्तानचे खेळाडू ‘बर्गर’ ‘पिझ्झे’ खात होते असे या चाहत्याने माध्यमांसमोर सांगितले. ‘एक हि पल में जसबात बदल दिये हालात बदल दिये’ असे सांगत ‘मारो मुझे मारो’ असे म्हणताना हा पाकिस्तानी चाहता दिसला. समाज माध्यमांवर हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरला झाला होता.

या व्हिडिओचा आधार घेत झोमॅटोने पाकिस्तानी संघाला उद्देशून ट्विट केले आहे. सामन्याच्या आदल्या रात्री म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी झोमॅटोने पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या ट्विटर हँडलला टॅज करून असे म्हटले आहे की जर तुम्हाला ‘बर्गर’ किंवा ‘पिझ्झे’ हवे असतील तर आम्हाला सांगा. आम्ही हाकेच्या दुरीवर आहोत. झोमॅटोचे हे ट्विट चांगलेच गाजले असून भारतीय चाहत्यांच्या भरपूर पसंतीस पडत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा