33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरधर्म संस्कृतीरामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू

रामनवमीसाठी अयोध्येतील राम मंदिरात प्रसादासाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू

रामनवमीनिमित्त जवळपास ५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता

Google News Follow

Related

गेल्या ५०० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश येऊन २०२४ मध्ये संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेल्या भगवान श्री रामाचे मंदिर निर्माण झाले. २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानंतर लाखोंच्या संख्येने राम भक्त अयोध्या गाठत आहेत. अशातच आता रामनवमी जवळ आली असून हा सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या मंदिराची साऱ्यांनी वाट पाहिली ते मंदिरही आता उभं राहिलं आहे. त्यामुळे यंदाचा रामनवमी उत्सव अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्या गाठण्याची शक्यता आहे.

राम लल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना प्रसादात लाडू मिळणार आहेत. राम नवमीसाठी १ लाख ११ हजार १११ किलोचे लाडू अयोध्येतील राम मंदिरात पाठवण्यात येणार आहेत. देवरा हंस बाबा ट्रस्टच्या वतीने हे लाडू अयोध्येत पाठवण्यात येणार आहेत. या ट्रस्टचे अध्यक्ष अतुल कुमार सक्सेना म्हणाले की, देवरा हंस बाबा ट्रस्ट १ लाख ११ हजार १११ किलोचा लाडू प्रसाद अयोध्येला पाठवणार आहे. लाडूचा प्रसाद प्रत्येक आठवड्याला देशभरातील विविध मंदिरात पाठवला जातो. काशी विश्वनाथ मंदिर, तिरुपती बालाजी अशा मंदिरांमध्येही लाडूचा प्रसाद पाठविला जातो. २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त या ट्रस्टने अयोध्येला ४० हजार किलो लाडू वाटले होते.

हे ही वाचा:

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ म्हणतो, मी झाडली सलमानच्या घरावर गोळी!

इंडी आघाडीचा जाहीरनामा देशाला दिवाळखोर बनवणारा

विम्याच्या पैशांसाठी फारुकने कुटुंबाच्या साथीने केली मानसिकदृष्ट्या विकलांगाची हत्या

बेंगळुरू स्फोटातील आरोपी अब्दुल ताहा बनला विघ्नेश आणि अनमोल कुलकर्णी

२२ जानेवारी रोजी भगवान रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला. त्यामुळे यंदाचा राम जन्मोत्सव खास मानला जात आहे. रामनवमीनिमित्त जवळपास ५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्याकरता विविध उपाययोजना आखल्या आहेत. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. हिंदू पंचांगनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणारी नवमीची तिथी १६ एप्रिल मंगळवार, दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होत आहे तर १७ एप्रिल दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी समाप्त होईल. अशात उदया तिथि नुसार रामनवमी ही १७ एप्रिल २०२४ ला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा