27 C
Mumbai
Monday, February 26, 2024
घरधर्म संस्कृतीअयोध्या: कोण आहेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे संबंध!

अयोध्या: कोण आहेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे संबंध!

प्रभू राम लल्लाचा अभिषेक करण्याचा बहुमान पंडित लक्ष्मीकांत दीक्षितांना

Google News Follow

Related

प्रभू राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहेत.सोहळ्याला अगदी थोडे दिवस राहिले आहेत.हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातील लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.दरम्यान, राम लल्लाच्या अभिषेकाच्या वेळी गर्भगृहात उपस्थित असलेल्या पाच लोकांपैकी पंडित लक्ष्मीकांत दीक्षित हे देखील असणारा आहेत.राम मंदिरातील मुख्य पुजारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.वैदिक मंत्रोच्चाराच्या वेळी एकूण १२१ पुजारी उपस्थित राहणार असले तरी प्रभू राम लल्लाचा अभिषेक करण्याचा बहुमान पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांना मिळणार आहे.पंडित लक्ष्मीकांत दीक्षित हे १७ व्या शतकातील प्रसिद्ध पंडित गागा भट्ट यांचे वंशज आहेत.पंडित गागा भट्ट यांनी १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभिषेक केला होता.

पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांना राम मंदिरात मुख्य आचार्य म्हणून बहुमान मिळाला आहे.पंडित दीक्षित यांचे कुटुंब पिढ्यान-पिढ्या काशीमध्ये राहत आहेत.डेक्कन हेराल्डच्या बातमीनुसार, त्यांचा मुलगा सुनील लक्ष्मीकांत दीक्षित म्हणाले की, आमचे पूर्वज पूर्वी महाराष्ट्रात राहत होते आणि तिथे पूजा करत होते.नागपूर आणि नाशिक या संस्थानात त्यांच्या पूर्वजांनी अनेक धार्मिक विधी केले आहेत, असे सुनील दीक्षित यांनी सांगितले.

हे ही वाचा:

एटीएम लुटण्यासाठी केला गॅस कटरचा वापर, चोरी करता आली नाही पण जाळून आले २१ लाख रुपये!

गिधाडेही आता बसणार रेस्टॉरन्टमध्ये!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही झाला डिपफेकचा शिकार!

देवरा यांच्या रूपात काँग्रेसमधील आणखी एक ‘वंशज’ गळाला

ते पुढे म्हणाले की, आमच्या पूर्वजांपैकी एक म्हणजे विश्वेश्वर दत्त, ज्यांना जग गागा भट्ट म्हणून ओळखते.गागा भट्ट यांना १७ व्या शतकात प्रचंड प्रसिद्धी मिळाली.ते पुढे म्हणाले की, पंडित गागा भट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे अध्यक्षपद भूषवले.गागा भट्ट यांचे पूर्वज महाराष्ट्रीयन ब्राह्मण होते, ते मूळचे महाराष्ट्रातील पैठणजवळील एका गावातील होते.तथापि , नंतर ते वाराणसी शहरात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
131,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा