32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरक्राईमनामाएटीएम लुटण्यासाठी केला गॅस कटरचा वापर, चोरी करता आली नाही पण जाळून...

एटीएम लुटण्यासाठी केला गॅस कटरचा वापर, चोरी करता आली नाही पण जाळून आले २१ लाख रुपये!

ठाण्यातील घटना

Google News Follow

Related

चोरीच्या अनेक घटना आपण रोज ऐकतो आणि वाचतो, पण चोरीच्या काही पद्धती आश्चर्यकारक आहेत. अशीच एक विचित्र चोरीची घटना महाराष्ट्रातील ठाण्यातून समोर आली आहे.चोरट्यांनी १ रुपये देखील चोरले नाहीत, परंतु त्यांच्या प्रयत्नात २१ लाख रुपये जळून खाक झाले. वास्तविक, चोरी करायला गेलेल्या चोरट्यांमुळे एटीएमला आग लागली, त्यात २१ लाख रुपये जळून खाक झाले.

आजकाल चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ होत आहे.एटीएम चोरांपासून सावध राहण्यासाठी बँका प्रयत्न करत असतात.मात्र, नवनवीन शक्कल लढवण्यात चोर, चार पावले पुढे असतात.परंतु, हीच नवीन शक्कल चोरांना महागात पडली आहे.एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत असतानाच तेथे आग लागली, त्यामुळे त्यात ठेवलेली २१ लाख रुपयांची रोकड जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.ही घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घडली.ठाणे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना १३ जानेवारी रोजी मध्यरात्री डोंबिवली टाऊनशिपमधील विष्णू नगर भागात असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम बुथ चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. ही चोरी करण्यासाठी चोरट्यांनी गॅस कटरचा वापर केला.पंरतु एटीएम मध्ये आग लागली.

हे ही वाचा:

गिधाडेही आता बसणार रेस्टॉरन्टमध्ये!

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही झाला डिपफेकचा शिकार!

पतीच्या वाहनचालकाशी प्रेमसंबंध, पत्नीने स्वतःचे ‘कुंकू पुसले’

देवरा यांच्या रूपात काँग्रेसमधील आणखी एक ‘वंशज’ गळाला

 

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, १३ जानेवारी रोजी रात्री एक ते दोनच्या दरम्यान अज्ञात लोकांनी एटीएम बुथच्या शटरचे कुलूप तोडले आणि आत शिरले आणि गॅस कटरने एटीएम कापण्यास सुरुवात केली. यावेळी जास्त उष्णता निर्माण झाल्याने एटीएमला आग लागली.आगीमुळे एटीएमचे अंतर्गत भाग खराब झाले असून, मशीनमध्ये ठेवलेली २१,११,८०० रुपयांची रोकड जळून खाक झाल्याचे त्यांनी सांगितले. “एटीएम केंद्राच्या व्यवस्थापनासाठी जबाबदार असलेल्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टमच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तपशिलांच्या आधारे, पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.चोरांचा पोलीस शोध घेत असून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४५७ (रात्री घरफोडी करणे किंवा घर फोडणे), ३८० (कोणत्याही इमारतीत, तंबूत किंवा भांड्यात चोरी करणे आणि ४२७ (दुर्घटना करणे आणि त्यामुळे पन्नास रुपयांचे नुकसान करणे) अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा