31 C
Mumbai
Friday, June 17, 2022
घरधर्म संस्कृतीहिजाब बंदीमुळे अनेक मुलींनी सोडले शिक्षण

हिजाब बंदीमुळे अनेक मुलींनी सोडले शिक्षण

Related

हिजाब घालायला मिळत नाही म्हणून कर्नाटकात अनेक मुलींनी शिक्षण सोडल्याचा अजब प्रकार समोर येतो आहे. तीन महिन्यांपूर्वी कर्नाटकात उच्च न्यायालयाने हिजाबबाबत निर्णय दिला होता. मुस्लिम विद्यार्थिनींना महाविद्यालयाचे नियम पाळावे लागतील,असा न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यामध्ये विद्यार्थिनींना हिजाबशिवाय महाविद्यालयात यावे लागेल.

या दरम्यान, कर्नाटकात हिजाबला परवानगी नाही म्हणून, विद्यार्थिनी महाविद्यालयात येत नाही आहेत.
कर्नाटकातील उप्पिनगाडी कॉलेजमधून हे प्रकरण समोर आले आहे. या निर्णयामुळे त्या कॉलेजच्या नऊ विद्यार्थ्यांनींनी आपला अभ्यास अपूर्ण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य के श्रीधर यांनी सांगितले की, पदवीच्या शेवटच्या वर्षाचे १९ विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत आणि नवीन सत्रातही गैरहजर आहेत. त्यावेळी शिक्षकांनी विद्यार्थिनींना समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरी विद्यार्थिनी हिजाब घालीयाची परवानगी मागत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला, कर्नाटकातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २४ विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल त्या मुलींना सात दिवसांसाठी वर्गात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. उप्पिनगडी महाविद्यालयात हिजाब परिधान करून आलेल्या एका विद्यार्थिनीला सहा दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप या विद्यार्थिनींवर करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

मलिक, देशमुखांच्या मतदानावर फुली

पाकिस्तानला चहा फुंकून प्यावा लागणार!

लोकसभेच्या ४८ जागांसाठी भाजपची जय्यत तयारी

अग्निपथ योजनेसाठी केंद्र सरकारने वाढवली वयोमर्यादा

हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. हिजाब घालणे ही धार्मिक प्रथा नाही त्यामुळे तो परिधान करण्यास परवानगी देता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,916अनुयायीअनुकरण करा
10,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा