29 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरधर्म संस्कृतीमंदिरे आणि हिंदू प्रतीकांवर हल्ल्याच्या निमित्ताने या देशांना भारताने फटकारले

मंदिरे आणि हिंदू प्रतीकांवर हल्ल्याच्या निमित्ताने या देशांना भारताने फटकारले

भारतीय समुदायावर झालेल्या हल्ल्याचा आणि हिंसाचाराचा भारताकडून तीव्र निषेध

Related

केंद्रातील मोदी सरकारने हिंदू आणि हिंदू प्रतीकांवर होणारे वाढते हल्ले आणि तोडफोड अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. अनेक देशांमध्ये घडणाऱ्या अशा घटनांवर सरकार लक्ष ठेवून आहे आणि लवकरच या देशांना कडक संदेश देण्याचा विचार करत आहे.लेस्टरमध्ये भारतीय समुदायावर झालेल्या हल्ल्याचा आणि हिंसाचाराचा भारताने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ब्रिटीश सरकार आणि अधिकारी फुटीरतावादाला चालना देण्यात गुंतलेल्या शीख कट्टरवाद्यांना मिळणारा निधी रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलत नसल्याबद्दलही सरकार गंभीर आहे.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रातील मोदी सरकारने भारतविरोधी घटनांवरून कॅनडा आणि ब्रिटन या दोन्ही देशांच्या सरकारांना कडक संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या देशांमध्ये हिंदुत्वविरोधी घटनांची गंभीर दखल घेतली आहे.कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी रशियाने युक्रेनियन व्यापलेल्या प्रदेशात सार्वमत घेण्याचा तीव्र निषेध केला आहे, परंतु १९ सप्टेंबर रोजी ब्रॅम्प्टन आणि ओंटारियो येथे बंदी घातलेल्या फुटीरतावादी संघटना शीख फॉर जस्टिसने आयोजित केलेल्या सार्वमतावर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही मोदी सरकारने ट्रूडो सरकारला तीन राजनैतिक संदेश पाठवले असून त्यांना जस्टिस फॉर शीख सार्वमत थांबवण्यास सांगितले आहे.

या देशांमध्ये झाले हल्ले
नुकतेच कॅनडातील ओंटारियो येथील ब्रॅम्प्टन येथील स्वामीनारायण मंदिरावर हल्ले झाले होते. याबाबत ट्रुडो सरकारने या घटनेमुळे नाराज असल्याचे म्हटले आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. शीख कट्टरतावादी चळवळीला या दोन्ही देशांतून निधी दिला जातो. भारतविरोधी कट्टरतावाद्यांवर कारवाई न करणे म्हणजे त्यांना सहकार्य करण्यासारखे आहे, असे सांगत भारताने ब्रिटनबरोबरच अमेरिकेलाही कडक संदेश दिला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा