29 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
घरधर्म संस्कृतीतिळगुळ घ्या गोड बोला

तिळगुळ घ्या गोड बोला

"तिळगुळ घ्या आणि गोड बोला."

Google News Follow

Related

एखाद्याबरोबर जर का आपला दुरावा झाला असेल तर तो लगेच दूर करणे गरजेचे असते कारण आजच्या धकाधकीच्या काळांत आपल्याला रुसवा काढायलातेवढा वेळच नसतो पण तुम्ही जर का आज कोणाला “तिळगुळ घ्या गोड बोला “असं म्हणून लाडू खिलवलात तर तुमच्यामुळे त्याच्या चेहऱयावर नक्की हसू आणाल .अहं मी तुम्हाला सल्ला नाही देत हा खरंच २०० टक्के रामबाण इलाज आहे. तेव्हा “तिळगुळ घ्या आणि गोड बोला.”

हिंदू धर्मात सूर्यदेवाला विशेष महत्त्व आहे. सूर्य धनु राशीचा प्रवास थांबवून १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य उत्तरायण होईल. सूर्याच्या उत्तरायणावर सर्व प्रकारची शुभ कार्ये, यज्ञ-विधी, विवाह शुभ कार्ये सुरू होतात शास्त्रानुसार सूर्याच्या उत्तरेकडे होणाऱ्या हालचालीला उत्तरायण आणि दक्षिणेकडे होणाऱ्या हालचालीना दक्षिणायन म्हणतात. वैदिक शास्त्रानुसार उत्तरायण आणि दक्षिणायन या सूर्याच्या दोन स्थिती आहेत . दरवर्षी चौदा जानेवारीपासून सूर्य उत्तरायण काळात मध्ये प्रवेश करतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी तीर्थयात्रा आणि गंगासागरात स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात गंगासागर मोक्षाचे निवासस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने लाखो भाविक मोक्षप्राप्तीसाठी गंगा स्नान करतात आणि मोक्षाची कामना करतात . मकर संक्रांतीला गंगा-यमुनेच्या तीरावर अनेक जत्रा भरतात. मकर संक्रांतीच्या दिवशी देशातील प्रसिद्ध गंगा सागर मेळा देखील आयोजित केला जातो. मोठ्या संख्येने भाविक येथे पोहोचून स्नान, जप, दानधर्म, तर्पण इत्यादी करतात. गंगासागराला महातीर्थाचा दर्जा प्राप्त झाला आहे. वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो. या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात

ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांती
आजच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच ‘संक्रांत’असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटलं जातं. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात.

सुगड पूजन
आपल्याकडे भोगीला सुगड पुजले जातात. त्‍याकरता सवाष्‍ण स्‍त्रीया पाच छोटी गाडगी व पाच मोठी गाडगी
घेऊन येतात. त्‍यामध्‍ये भोगीच्या भाजीत वापरण्यात येणाऱ्या भाज्या भरल्‍या जातात. यालाच ‘वाण पुजणे’ अस पण म्हणतात

उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे काय?
हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात, म्हणजेच वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो. या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा कालावधी सहा महिन्यांचा असतो, त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात.

हिंदू धर्मात उत्तरायण काळ शुभ
मकर संक्रांतीचा सण सूर्याच्या उत्तरायण काळात साजरा केला जातो. हिंदू धर्मात उत्तरायण काळ शुभ मानला जातो. उत्तरायण हा देवांचा दिवस असं सुद्धा म्हणतात. सूर्याचे उत्तरायण झाल्यावर सर्व प्रकारची शुभ कार्ये करायचे मुहूर्त सुरू होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण असताना गंगेत स्नानाला विशेष महत्त्व असते. गुजरात आणि महाराष्ट्रात मकर संक्रांतीचा सण उत्तरायण या नावाने साजरा केला जातो तर उत्तर भारतात हा दिवस खिचडी म्हणून साजरा करतात.

उत्तरायण कालावधीचे महत्त्व
उत्तरायण म्हणजे उत्तरेकडे जाणे किंवा सरकणे. हिंदू धर्मात जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो तेव्हा तो खूप शुभ मानला जातो अस मानले जाते की, जेव्हा सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे सरकतो तेव्हा सूर्याची किरण निष्प्रभ होतात, तर जेव्हा सूर्य पूर्वेकडून उत्तरेकडे सरकतो तेव्हा सूर्याची किरणे चांगली म्हणजेच शुभ मानली जातात आणि आपल्याला आरोग्य प्रदान करतात. मकर संक्रांतीच्या सूर्याच्या उत्तरायणानंतर हवामान बदलू लागते. वातावरणांत छान थंड गर वारे असतात , यामुळेच या दिवसांत खूप छानछान फळे, फुले, भाज्यासुद्धा मुबलक प्रमाणांत असतात.

यामुळे आपल्या आरोग्याला पोषक असेच आपण खाल्ले तर तन आणि मन सुदृढ होते. मुळात सूर्यनारायण आपल्याला वर्षभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि ऊर्जा देतातच. पण अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा या पर्वापासून सूर्य उपासना फलदायी असल्यामुळे करतात. सूर्याच्या उत्तरायणानंतर शरद ऋतू मंद होऊन वसंत ऋतूचे आगमन होते. उत्तरायणात दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. सूर्योदय होत असताना प्रमुख तीर्थक्षेत्रांवर गंगेत स्नान करण्याचे महत्त्व असते. म्हणूनच उत्तरायणावर दान आणि पूजे चेही विशेष महत्त्व आहे.

सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. याशिवाय सूर्य दोन अयनांमध्ये बदलतो, ज्यांना उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. सूर्याचे दोन अयन सहा सहा महिन्यांचे असतात. कालगणनेनुसार सूर्य मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हा त्या काळाला उत्तरायण म्हणतात. आणि सूर्याचा कर्क राशीपासून धनु राशीपर्यंतच्या प्रवासाला दक्षिणायन म्हणतात. उत्तरायण काळ हा देवतांचा दिवस आणि दक्षिणायन ही देवतांची रात्र मानली जाते. उत्तरायणात शरीर सोडल्याने मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जात. महाभारत काळात सूर्योदय होत असताना भीष्म पितामहांनी प्राणत्याग केला होता.

हिंदू मान्यतेनुसार असं म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी मरण आल्यास त्यांचा पुनर्जन्म होत नाही, तर ते थेट स्वर्गात जातात म्हणजेच माणसाला मुक्ती मिळते. संक्रांत,जिच्या नावावरून या सणाला नाव देण्यात आले आहे,ती एक देवता होती जिने शंकरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, करीदिन किंवा किंक्रांत, देवीने खलनायक किंकरासुरचा वध केला.

मकर संक्रांतीशी संबंधित सणांना ती ज्याज्या प्रदेशात साजरी करतात त्यानुसार अनेक नाव आहेत. उदाहरणार्थ, उत्तर भारतीय हिंदू आणि शीख लोक याला ‘माघी’ म्हणतात . महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये याला मकर संक्रांती आणि पौष सोंगक्रांती म्हणतात.

तर मध्य भारतात सुकरात, आसामीमध्ये माघ बिहू, पूर्व उत्तर प्रदेशात खिचडी, गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायण आणि तामिळनाडूमध्ये थाई पोंगल किंवा पोंगल म्हणतात. मकरसंक्रांतीला आपण सणाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करतो. पवित्र नद्यांच्या ठिकाणी स्नान करतात, गरजूंना दानधर्म करतात, पतंग उडवतात, तीळ आणि गुळापासून बनवलेले तिळगुळ तयार करतात आणि पशुधनाची पूजा करतात तर भारतातील शेतकरी चांगले पीक येण्यासाठी प्रार्थना करतात.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

चांगले पीक येण्यासाठी प्रार्थना

मध्य भारतात सुकरात, आसामीमध्ये माघ बिहू, पूर्व उत्तर प्रदेशात खिचडी, गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्तरायण आणि तामिळनाडूमध्ये थाई पोंगल किंवा पोंगल म्हणतात. मकरसंक्रांतीला आपण सणाच्या वेळी सूर्यदेवाची पूजा करतो. पवित्र नद्यांच्या ठिकाणी स्नान करतात, गरजूंना दानधर्म करतात, पतंग उडवतात, तीळ आणि गुळापासून बनवलेले तिळगुळ तयार करतात आणि पशुधनाची पूजा करतात तर भारतातील शेतकरी चांगले पीक येण्यासाठी प्रार्थना करतात.गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा दिवस आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव म्हणून गेल्या काही वर्षांपासून साजरा करतात. यादिवशी  तिळ आणि गुळाचे लाडू किंवा चिक्की एकमेकांना देऊन वाटले जातात तिळ गुळ गोड सूचित करते की लोकांनी त्यांच्यातील मतभेद असूनही शांततेत आणि सद्भावनेने एकत्र राहिले पाहिजे. ज्याप्रमाणे तीळ आणि गुळ एकमेकांना घट्ट चिकटून लाडवाचा गोडवा वाढवतात त्याप्रमाणेच या संक्रांतीला तिळगुळ एकमेकांना भरवून आपल्या नात्यांचा गोडवा वाढवूया. तेव्हा “तिळगुळ घ्या आणि गोड बोला”.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा