29 C
Mumbai
Tuesday, October 3, 2023
घरधर्म संस्कृतीमृत मुबिनने आत्मघाती स्फोट करण्यासाठी शरीरावरील सगळे केस काढले

मृत मुबिनने आत्मघाती स्फोट करण्यासाठी शरीरावरील सगळे केस काढले

कोईमतूरमध्ये झाला होता स्फोट

Google News Follow

Related

कोईमतूर येथे झालेल्या स्फोटातील मृत झालेला जमेशा मुबिन हा आत्मघातकी स्फोट घडविण्यासाठी जात असल्याचे समोर आले असून त्याने या मोहिमेला निघण्यापूर्वी शरीरावरील संपूर्ण केस काढल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आत्मघातकी दहशतवाद्यांनी शरीरावरील सगळे केस काढून मग मोहिमेवर जाण्याची पद्धत आहे. मुबिन याचे शवविच्छेदन केल्यावर ही बाब स्पष्ट झाली.

२९ वर्षीय मुबिन हा इंजीनियरिंगचा विद्यार्थी होता. तामिळनाडूतील कोट्टायमडू या भागात तो आपल्या गाडीने जात असताना त्याच्या गाडीत ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. कोट्टायमडू हा भाग अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. संगमेश्वरार नावाच्या मंदिरावर तो हल्ला करण्यासाठी निघाला होता. पण त्याची ही योजना फसली. त्याच्या गाडीत असलेल्या सिलिंडरचा गाडी चालवत असतानाच स्फोट झाला आणि त्यात तो गतप्राण झाला. प्रारंभी, हा केवळ एक सिलिंडरचा स्फोट असल्याचे म्हटले जात होते. पण नंतर हा जिहादी हल्ला करण्याच्या उद्देशाने निघाला असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

केरळची शोकांतिका; मला नर्स व्हायचे होते, पण आता मी इसीसची दहशतवादी आहे

फॅशन स्ट्रीटवर आगीचा भडका

नाशिकमध्ये शालिमार एक्सप्रेसला आग

मोरबी दुर्घटनेत मदतीसाठी गेले आणि मिळाले स्वतःच्याच मुलांचे मृतदेह

 

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या बातमीत हे स्पष्ट झाले की, त्याचे शरीर पूर्णपणे जळलेले नव्हते त्यावरून हे स्पष्ट झाले की, त्याने शरीरावरील सगळे केस काढले होते. ही पद्धत आत्मघातकी स्फोट घडविणारे नियमित वापरतात.

मुबिन हा इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेकडे आकर्षित झाला होता. त्यामुळे त्यानेही जिहादची तयारी केली होती. जमेशा मुबिनच्या घरातून पोलिसांना यासंदर्भात काही कागदपत्रे सापडली. त्यात सीएए कायदा, मुस्लिमांना दुय्यम नागरीक म्हणून मिळत असलेला दर्जा, हिजाबचे प्रकरण, विविध देवांची नावे असा मजकूर त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेला आढळला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा