समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार अबू आजमी यांनी मुघल शासक औरंगजेब याची प्रशंसा केल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सपा पक्षावर निशाणा साधत म्हटले की, अबू आजमींना पक्षातून बाहेर काढा, आणि तसे न झाल्यास यूपीला पाठवा, बाकी अशा लोकांवर उपचार आम्ही स्वतःच करून घेऊ.
यूपी विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “त्या व्यक्तीला (समाजवादी) पक्षातून काढा आणि यूपीला पाठवा, बाकी इलाज आम्ही स्वतः करून घेऊ. जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेवर गर्व करण्याऐवजी लज्जा वाटत असल्याचे दाखवतो आणि औरंगजेबाला आपला नायक मानतो, त्याला भारतात राहण्याचा अधिकार असावा का? समाजवादी पक्षाने याचे उत्तर द्यावे.”
ते पुढे म्हणाले, एकीकडे तुम्ही महाकुंभावर दोष ठेवत असता, तर दुसरीकडे तुम्ही औरंगजेबासारख्या क्रूर व्यक्तीची स्तुती करता, ज्याने देशातील मंदिरांचा नाश केला. तुम्ही तुमच्या त्या आमदाराला नियंत्रणात का ठेवू शकत नाही? त्याच्या वक्तव्याचा निषेध का केला नाही? शाहजहानने आपल्या चरित्रात लिहिले आहे की, ‘तुझ्यापेक्षा (औरंगजेब) चांगले तर हिंदू आहेत, जे माता-पित्यांच्या हयातीत सेवा करतातच, पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना तर्पणाद्वारे जलसंपर्ण करतात.’ महाकुंभाचा उल्लेख करताना सीएम योगी म्हणाले की, ‘ज्याची जशी दृष्टी, त्याला प्रयागराजात तशीच सृष्टी दिसली.’
दरम्यान, औरंगजेबाची प्रशंसा केल्याबद्दल सपा नेते अबू आजमी यांना महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात अबू आजमी यांच्या विरोधात प्रस्ताव मांडला, जो सभागृहाने मंजूर केला.
हे ही वाचा:
कोरटकर तर चिल्लर, आव्हाडांवर बोला, नेहरूंचा निषेध करा, आहे हिंमत?
औरंगजेबाला महान राजा म्हणणारे अबू आझमी निलंबित!
५५ लाख परदेशी भाविक महाकुंभात डुंबले
मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एफडीआय इक्विटी इनफ्लो १६५ अब्ज डॉलरवर
या अधिवेशनादरम्यान अबू आसिम आजमी यांना विधानभवनाच्या आवारात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी अबू आजमी यांनी औरंगजेबासंबंधी केलेल्या वक्तव्यावर सोशल मीडियावरून सफाई दिली होती. त्यांनी म्हटले होते की त्यांच्या शब्दांना तोडून-मोडून दाखवले गेले.
अबू आजमी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहित आपले औरंगजेबाबाबतचे वक्तव्य मागे घेतले. “माझ्या शब्दांना तोडून-मोडून दाखवले गेले आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह यांच्याबद्दल मी फक्त तेच म्हटले आहे, जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतीही अपमानजनक टिप्पणी केलेली नाही. पण, तरीही माझ्या या विधानामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान परत घेतो.”







