30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरधर्म संस्कृतीस्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झाले शस्त्रपूजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात झाले शस्त्रपूजन

Google News Follow

Related

दादरच्या शिवाजी उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात गुरुवारी अर्थात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला असलेल्या खंडेनवमीला अर्थात आयुधपूजनाच्या दिवशी स्मारकातील विविध उपक्रमांनी आपापल्या साधनांचे, शस्त्रांचे पूजन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी आजही ब्रिटिशकालीन शस्त्रबंदीमुळे लोकांना कसे स्वसंरक्षण करणे अशक्य झाले आहे, ते सांगून शस्त्रांचे महत्त्वही उपस्थितांना सांगितले.

स्मारकातील मुष्टियुद्ध, फेन्सिंग, नेमबाजी, तिरंदाजी, तायक्वांडो, व्यायामशाळा, गायन, नृत्य कलावर्ग आदी विविध उपक्रमांमधील सदस्यांनी आणि विद्यार्थ्यांनी शस्त्रपूजन केले. तसेच ग्रंथालय, हिंदुस्थान पोस्ट न्यूज पोर्टल यामधील सदस्यांनीही आपापल्या साधनांचे पूजन केले. यावेळी स्मारकाचे विश्वस्त वैद्य चिंतामण साठे, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर उपस्थित होते. शार्दुल आपटे यांनी प्रास्ताविक केले तर लिटल मॉनिटर अर्थात हर्षद नायबळ या चिमकुल्याने स्वातंत्र्यवीरानी रचलेले शस्त्रगीतही दमदारपणे सादर केले.

 

हे ही वाचा:

आव्हाडांना हाकला!

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

अनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक! पण तात्काळ जामीन

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेविरोधात हिंदूंवर इस्लामिक हल्ले

 

शस्त्रपूजनासाठी अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. फुले वाहून शस्त्रांची पूजा करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सशस्त्र क्रांतिचे उद्गाते होते. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला. त्यामुळे सावरकर स्मारकात दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शस्त्रपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीतही शस्त्रपूजनाचे महत्त्व वेगळे आहे. लहानथोर असे सगळेच या कार्यक्रमात सहभागी झालेले असल्यामुळे हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा उद्देशही सफल झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा