28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामाअनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक! पण तात्काळ जामीन

अनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक! पण तात्काळ जामीन

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली असून नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना ही अटक करण्यात आल्याचे समजते. ठाणे येथील अनंत करमुसे या तरुणाला आव्हाडांच्या सांगण्यावरून त्यांच्या बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर होता.

गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात ठाण्यातील तरुण अनंत करमुसे याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानी अनंत करमुसे याला नेण्यात आले होते. अनंत करमुसेला नेण्यासाठी खाकी वर्दीतील दोन पोलीस त्याच्या घरी आले होते. तर आव्हाड यांच्या निवासस्थानी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली होती. अनंत करमुसे याच्या फेसबुक पोस्टवर अक्षेप घेत ही मारहाण करण्यात आली होती. राज्यभर हे प्रकरण चांगलेच गाजले असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच संदर्भात गुरुवार १४ ऑक्टोबर रोजी जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली असून नंतर न्यायालयाने त्यांना जामीनावर मुक्त केले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वर्तक नगर पोलिंसानी आव्हाड यांना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले. तर न्यायालयाने १० हजार रुपयांच्या बॉण्डवर आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला.

हे ही वाचा:

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

आर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच

‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’

जावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात

अनंत करमुसे यांनी या प्रकरणात न्यूज डंकाशी बातचीत केली असून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मागच्या वर्षी ५ एप्रिल २०२० ला मला मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेऊन जी मारहाण करण्यात आली त्यात आज एक छोटे पाऊल म्हणून जितेंद्र आव्हाड याना अटक करून नंतर जामीन देण्यात आला. हे बघत थोडं तरी का होईना पण कायद्याचे राज्य आहे असे वाटू लागले आहे. मला जी मारहाण करण्यात अली ती अमानुष होती. मंत्री असताना आव्हाड यांचे वाहनचालक, त्यांचे अंगरक्षक, त्यांचा स्वीय साहाय्यक या सर्वांचा या मारहाणीत सहभाग होता. त्यांना एका दिवसात जामीन मिळाला. जे पोलीस सहभागी होते ते आजही पोलीस सेवेत आहेत. ते सेवेत राहावेत म्हणून त्यांना तात्काळ जामीन देण्यात आला. ज्या पोलीसांनी अपहरण करून मारहाण करण्यासारखे गंभीर कृत्य केले ते आज सेवेत आहेत हे खरंच दुर्दैवी आहे. पण माझा न्यायासाठीचा हा लढा सुरूच राहिल” असे करमुसे यांनी म्हटले आहे.

या विषयी प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ‘यदा यदा ही कर्मस्य’ असे म्हटले आहे. “अटक होणार म्हणून ज्यांची चर्चा होती ते फरार आहेत. रांग मोडून आव्हाडांना अटक झाली. आणि बेलवर सुटकाही… चला सुरुवात तर झाली…. आता हाकला त्यांना. अटक झालेला मंत्री मंत्रिमंडळात कसा चालेल? अनंत करमुसेना न्याय मिळाला. यदा यदा सी ‘कर्मस्य’ ” असे भातखळकर म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा