28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरक्राईमनामाआर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच

आर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच

Related

क्रूझ रेव्ह पार्टीत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या तावडीत सापडलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम आता आणखी वाढला आहे. गुरुवारी सत्र न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीत कोणताही निर्णय झाला नाही. आता २० ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.

या जामीन अर्जासंदर्भात सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली पण न्यायालयाने त्याविषयीचा निकाल राखून ठेवला. २० ऑक्टोबरला न्यायालया याबाबतचा निर्णय देणार असून त्याला आता आणखी काही काळ आर्थर रोड तुरुंगात राहावे लागेल.

गुरुवारी एनसीबीचे वकील अनिल सिंग आणि आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनीही आपापली बाजू मांडली. त्यामुळे दोन्ही कडील युक्तिवाद संपल्यानंतरही न्यायालयाने निकाल राखून ठेवला. आता २० ऑक्टोबरला जामीनावरील निर्णय न्यायालय जाहीर करणार आहे. एनसीबीने यावेळी युक्तिवाद केला की, आर्यन खान हा गेली तीन वर्षे अमली पदार्थांचे सेवन करतो आहे. त्यामुळे त्याला आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट यांना जामीन देण्यात येऊ नये कारण ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा साक्षीदारांवर प्रभाव पाडू शकतात.

 

हे ही वाचा:

लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सुसाट: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’

सर्वाधिक मुले असलेल्या पालकांना मिझोराममध्ये दिले इनाम! कशासाठी ते वाचा…

जावयाच्या बचावासाठी नवाब मलिक रिंगणात

 

कॉर्डिलिया क्रूझवर झालेल्या पार्टीत आर्यन खान आणि त्याचे काही मित्र हे एनसीबीच्या छाप्यात हाती आले. एकूण १४ जणांना त्यावेळी ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यानंतर त्याला महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले होते. पण तिथे जामीनाचा निर्णय झाला नाही. त्यामुळे आता सत्र न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा