31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
घरराजकारणसंकेतला ३० लाखांचे बक्षीस; मुख्यमंत्र्यांनी दिली कौतुकाची थाप

संकेतला ३० लाखांचे बक्षीस; मुख्यमंत्र्यांनी दिली कौतुकाची थाप

Google News Follow

Related

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकावर नाव कोरणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरवर संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या संकेतने राष्ट्रकुल स्पर्धेत बजावलेल्या चमकदार कामगिरीची दखल महाराष्ट्र सरकारनेही घेतली आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेतला राज्य सरकारकडून ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. संकेत याच्या बरोबरच त्याचे प्रशिक्षक यांना देखील ७.५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

महाराष्ट्राबरोबरच भारताचे नाव उंचावणाऱ्या संकेतने वेटलिफ्टींगमध्ये ५५ वजनी किलो गटात रौप्य पदाकावर आपले नाव कोरले. वास्तविक सुवर्णपदकाला स्पर्श करण्यासाठी संकेतने अखेरच्या क्षणापर्यंत आघाडीवर होता. परंतु नंतर त्याच्या हाताच्या कोपराच्या दुखापतीमुळे त्याचा १३९ वजन उचलण्याचा प्रयत्न फसला.

अवघ्या १ किलोच्या फरकाने प्रतिस्पर्धी खेळाडूने सुवर्णपदक आपल्या नावावर करून घेतल्याने संकेतला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पण तरीही महाराष्ट्राच्या या सुपत्राने पहिले पदक जिंकून या स्पर्धेत भारतासाठीचे खाते उघडले. त्यामुळेच त्याच्या या रौप्य पदकाच्या कामगिरीची नोंद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत सरगरचे कौतुक करत राज्य सरकारकडून त्याला ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

ईडीला घाबरून आमच्याकडे, भाजपत येऊ नये

खासदार संजय राऊत यांची रविवारी सकाळपासून ईडीनं चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘संजय राऊत यांनीच सांगितले की, मी काहीच केले नाही. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? ईडीच्या कारवाईच्या भीतीने आमच्याकडे कुणी येत असेल, तर त्यांनी आमच्याकडे किंवा भाजपात येऊ नये. कुणीही दडपण आणि भीतीखाली पुण्याचे काम करु नका.”

शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आम्ही आज अतिवृष्टीचा आढावा घेतला, काही जणांचे पावसामुळे मृत्यू झाले, त्यांच्या मदतीचा आढावा घेतला. शेतपीकांचे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देऊ, शेतकऱ्यांना हे नविन शिवसेना भाजप युतीचे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेऊ.
.
सर्वांना पाणी मिळावे म्हणून प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नुकसानग्रस्ताना मदत करणार असून सर्वांना पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे्. आत्महत्या होणार नाही यासाठी प्रयत्नच नव्हे तर नियोजन करावे लागेल असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी राज्यसरकार कटीबद्ध आहे.

हे ही वाचा:

“संजय राऊत यांच्यावर होत असलेल्या कारवाईने आनंद”

“आमची सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब होत असताना पाहून समाधान वाटतंय”

संजय राऊत ईडीचणीत

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

आमचे सरकार सर्व घटकांना मदत करणार

सर्व सामान्यांचे सरकार आहे, सर्व घटकांना आमचे सरकार मदत करणार आहे. केंद्र सरकारची आपल्या सरकारला मोठी मदत मिळणार आहे. पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिले की, निधी पडू देणार नाही. योजनांना चालना देणार असून केंद्राचा निधी योग्य वापरु, रेल्वेचा प्रश्नही मांडण्यात आला त्यावर आम्ही लक्षकेंद्रीत करू.

रस्त्यांसाठी गुणवत्तापूर्ण कामे

मुख्यमंत्री म्हणाले, रस्त्याचा प्रश्न असून शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी गुणवत्तापूर्ण कामे करणार आहोत. जवळपास सहाशे किलोमिटरच्या रस्त्यांचे काम सुरु होणार असून सात हजार कोटी रुपये खर्च आहे. मुंबईत शंभर टक्के रस्ते सिमेंट – काँकीटचे काम होणार आहे. तसेच रस्ते राज्यात होतील. कामे गुणवत्तापूर्ण होतील कुणालाही पाठीशी घालणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा