31 C
Mumbai
Friday, May 24, 2024
घरराजकारणकेजरीवाल चीनकडून जमीन मिळवून देणार!

केजरीवाल चीनकडून जमीन मिळवून देणार!

आम आदमी पार्टीच्या वतीने दिली १० आश्वासने

Google News Follow

Related

आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल तुरुंगात होते त्यामुळे ते लोकसभा निवडणुकासाठी आपला जाहीरनामा घोषित करू शकले नाहीत. मात्र बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला असून त्यात १० आश्वासने दिली आहेत. त्यात चीनने भारताची जी जमीन हडप केली आहे ती आम आदमी पार्टी मिळवून देणार आहे. त्यासाठी लष्कराला संपूर्ण मोकळीक देण्यात येणार आहे.

केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या या घोषणा सांगितल्या. केजरीवाल म्हणाले की, मी तुरुंगात असल्यामुळे जाहीरनामा घोषित करू शकलो नव्हतो. पण अद्याप या निवडणुकीचे अनेक टप्पे शिल्लक आहेत त्यामुळे मी काही आश्वासने देत आहे. आम्ही १० गॅरेन्टी देत आहोत.

हे ही वाचा:

‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’

‘राजपुत्राचे जितके वय, काँग्रेसला त्यापेक्षाही कमी जागा मिळतील’

बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’

 

केजरीवाल म्हणाले की, आम्ही इंडी आघाडीशी या घोषणापत्राबाबत बोललेलो नाही पण त्याविषयी त्यांना कोणतीही समस्या नसेल हे मानायला हरकत नाही. मात्र जेव्हा इंडी आघाडी सरकारमध्ये येईल तेव्हा ही आश्वासने पूर्ण होतील.

अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या १० गॅरेन्टी अशा-

  • २४ तास विद्युत पुरवठा आणि देशभरात २०० युनिट इतकी वीज मोफत.
  • मोफत शिक्षण देण्यात येईल आणि सरकारी शाळांत खासगी शाळांप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध होतील.
  • सरकारी रुग्णालये उभारण्यात येतील. खासगी रुग्णालयांच्या तोडीची ही रुग्णालये असतील.
  • चीनकडे असलेली भारताची जमीन पुन्हा मिळविली जाईल. त्यासाठी लष्कराला मोकळीक दिली जाईल.
  • अग्निवीर योजना रद्द करण्यात येईल.
  • शेतकऱ्यांना पिकांवर किमान आधारभूत किंमत दिली जाईल.
  • दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल.
  • प्रत्येक वर्षी २ कोटी नोकऱ्या देणार.
  • देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त केले जाईल.
  • जीएसटी कायदा सुलभ केला जाईल.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा