29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना

मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना

Related

दिल्लीतील आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या जाहिरातींसाठी कोट्यवधींचा खर्च केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यासाठी गोरगरीबांना हाताशी धरले आहे. रिक्षावाल्यांना हे पोस्टर्स लावण्यासाठी पैसे देण्याचे आमीष दाखवून नंतर हात वर केले आहेत. दिल्ली पोलिसांनी असे पोस्टर्स लावणाऱ्या २५ लोकांना ताब्यात घेतले असून त्यात रिक्षावाले, लाकडी फ्रेम बनविणारे कामगार यांचा समावेश आहे. त्यांना मोदींविरोधात पोस्टर्स लावण्यासाठी पैसे देण्याचे आमीष आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी दिले खरे, पण या लोकांना पकडण्यात आल्यावर मात्र आमचा याच्याशी काही संबंध नाही, असे म्हणत या ‘आप’ नेत्यांनी हात वर केले आहेत.

हे ही वाचा:

मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन

…आणि केंद्राच्या मदतीमुळे तळोज्यातील ऑक्सिजन प्लँटला मिळाला स्पेअरपार्ट!

ऑक्सिजनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांच्या गठड्या वळल्या

इस्रायलने का केला मीडिया इमारतीवर हल्ला?

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात लसी परदेशात का पाठवल्या अशी पंतप्रधान मोदी यांना विचारणा करणारी पोस्टर्स ‘आप’ने बनविली आणि या गोरगरीबांना वाटून ती दिल्लीत विविध ठिकाणी लावण्यास सांगितले. त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २५ लोकांना ताब्यात घेतले आहे.

सन्डे एक्स्प्रेसने यासंदर्भात या ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांच्या घरी जाऊन परिस्थिती जाणून घेतल्यावर लक्षात आले की, रोजंदारीवर असलेले हे सगळे लोक आहेत आणि आपल्या उपजीविकेसाठी त्यांनी पोस्टर्स लावण्याची तयारी दर्शविली. त्यांना यात ‘आप’चा काही राजकीय हेतू आहे हे कळले नाही.

पूर्व दिल्लीतील मंडावाली या भागातून ज्या चार जणांना ताब्यात घेण्यात आले त्यातील राहुल त्यागी नावाच्या एकाने सांगितले की, आम्हाला ‘आप’चे नगरसेवक धीरेंद्र कुमार यांनी ११ मे रोजी २० बॅनर दिले आणि ६०० रुपये देण्याचे आश्वासनही दिले. हे बॅनर कल्याणपुरीत लावण्यास सांगण्यात आले होते. याबाबत कुमार यांच्याशी संपर्क साधल्यावर आपला याच्याशी काहीही संबंध नाही, असा पवित्रा कुमार यांनी घेतला. मजेची गोष्ट म्हणजे ‘आप’च्या नगरसेवकाने याचा इन्कार केला असला तरी ‘आप’ने संध्याकाळी आमच्या मुलांसाठी असलेल्या लसी परदेशात का पाठविल्या, असे जे पोस्टरवर लिहिले होते, तसेच ट्विट केले.

पोलिसांनी याबाबत सांगितले की, आम्ही २५ एफआयआर दाखल केले आहेत.

ज्यांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यांना सोडण्यात आले आहे. रिक्षाचालक त्यागीने सांगितले की, माझे आईवडील या सगळ्या घटनेमुळे निराश झाले आहेत. त्यागी म्हणाला की, ज्या इतर चार जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांनाही पोस्टर्स आणि बॅनर देण्यात आले.

पश्चिम दिल्लीतून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यात देवेंद्र कुमार, तिलक राज छाब्रा, अनिल गुलाटी, मुरारी, राकेश कुमार यांचा समावेश आहे. देवेंद्र याला या पोस्टर्स लावण्याच्या कामासाठी १५ हजार मिळाले. त्याने प्रिंटिंग प्रेस असलेल्या छाब्राला पोस्टर्स तयार करायला सांगितले. नंतर गुलाटी (लाकडी फ्रेम बनविणारा), राकेश (रिक्षावाला) यांना हाताशी धरून पोस्टर्स लावायला सांगितले.

भजनपुरा, खजुरी खास, दयालपूर येथेही असेच प्रकार घडले. त्यात पकडलेला १९ वर्षीय संजय कुमार याला पोस्टर्स लावण्यासाठी ४०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. हे सगळे कुणी करायला सांगितले होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

भातखळकरांनी केले ‘आप’ला लक्ष्य

यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ‘आप’च्या कारनाम्यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदींविरोधात पोस्टर लावण्यासाठी रिक्षावाल्यांना कामाला लावले. काम झाल्यावर त्यांनाही चुना लावला. त्यांचेही पैसे बुडवले. हे आहे केजरीवाल यांनी उचललेले ठाकरे सरकारचे ‘महाराष्ट्र मॉडेल’. यंत्रणा फक्त भाजपा आणि मोदींविरोधासाठी वापरायची, कोरोनाशी झुंज दुय्यम.

 

 

 

 

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा