29 C
Mumbai
Wednesday, June 29, 2022
घरक्राईमनामाआफरिन नेहमीच राहिली वादविवादांच्या केंद्रस्थानी

आफरिन नेहमीच राहिली वादविवादांच्या केंद्रस्थानी

Related

नुपूर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यावरून १० जून रोजी नमाजानंतर प्रयागराजसह इतर ठिकाणी हिंसक निदर्शने करण्यात आली होती. त्यांनतर उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने प्रयागराज हिंसाचाराचा सूत्रधार जावेद मोहम्मद उर्फ ​​जावेद पंपच्या घरावर बुलडोझर चालवले होते. त्यावेळी त्याची मोठी मुलगी आफरीन फातिमा हिच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले होते.

जावेद पंप यांची मुलगी आफरीन हिचे अनेक वादात नाव समोर आले आहे. जेएनयूची माजी विद्यार्थिनी आफरीन फातिमा गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयूमध्ये आणि बाहेर देशविरोधी कारवायांमध्ये सामील आहे. त्यामुळेच जेएनयूमध्ये डफली वाजवून तिच्या समर्थनार्थ योगी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर वायरल झाला आहे.

आफरीन ही शाहीन बाग कटाचा मास्टरमाईंड शरजील इमामची मैत्रीण आहे. तिने जेएनयूच्या सेंटर फॉर लिंग्विस्टिक्समधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिने २०२१ मध्ये जेएनयू सोडले. त्यानंतर तिने अलीगड मुस्लिम विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथून तिने भाषाशास्त्रात बीए ऑनर्स आणि एमए केले. विद्यार्थी राजकारणात ती खूप सक्रिय असते. २०१९ मध्ये दिल्लीत CAA आणि NRC विरुद्धच्या आंदोलनात ती खूप सक्रिय होती. अफजल गुरु हा २००१ च्या संसदेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी अफझलला दोषी ठरवून फाशी देण्यात आली होती. त्या अफजलला तिने निर्दोष असल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा:

क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम

“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”

परदेशात बँक खाते आहे का, किती रक्कम आहे? ईडीने राहुलना विचारले!

सदाभाऊ खोतांची विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार

२५ जानेवारी २०२० रोजी ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आफरीनने जमावाला भडकवण्याचा प्रयत्न केला होता. सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय मुस्लिमांच्या विश्वासास पात्र नाही, असं ती सीएए आणि एनआरसीच्या निषेधार्थ म्हणाली होती. हिजाबच्या वादातही ही आफरीन खूप सक्रिय होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,941चाहतेआवड दर्शवा
1,920अनुयायीअनुकरण करा
11,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा