31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरराजकारणमोदींची स्तुती केली म्हणून अलीगड मुस्लिम विद्यापीठाने परत मागितली पीएचडी! विद्यार्थ्याचा आरोप

मोदींची स्तुती केली म्हणून अलीगड मुस्लिम विद्यापीठाने परत मागितली पीएचडी! विद्यार्थ्याचा आरोप

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापिठाने बहाल केलेली डॉक्टरेट पदवी विद्यापिठाने परत मागीतल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे. डॉ. दानिश रहिम असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी विद्यापिठाच्या कारभाराच्या विरोधात न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.

दानिश हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या भाषा विज्ञान विभागात पीएचडीचा विद्यार्थी होता. या वर्षी त्याला विद्यापीठतर्फे पीएचडी बहाल करण्यात आली. ९ मार्च २०२१ रोजी त्याला पीएचडी प्रदान करण्यात आली. तर त्याची सिनियर मारिया नईम हिला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पीएचडी डिग्री दिली गेली. पण आता हे डिग्री विद्यापीठाकडून परत मागितली जात आहे. त्यांना डिग्री परत मागताना कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:

‘एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबात सरकारकडून केवळ घोषणाच आणि तोंडाची वाफ’

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू 

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

दानिशने अलीगड मुस्लिम विद्यापीठावर आरोप केले आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळेच विद्यापीठाने त्याच्याकडून पीएचडी परत मागितली आहे. २२ डिसेंबर २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अलिगढ मुस्लिम विद्यापीठात भाषण झाले. विद्यापीठाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आले होते.

या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना दानिश याने नरेंद्र मोदींच्या भाषणाचे कौतुक केले होते. या नंतर त्याच्या विभागाचे प्रमुख असणारे मोहम्मद जहाँगीर यांनी त्याला बोलवून घेतले होते. तू एक विद्यार्थी आहेस. तू कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेणे योग्य नाही असे त्यांनी सांगितले. तुझ्या बोलण्यातून तू उजव्या विचारांचा वाटतोस असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता दानिशची पीएचडी परत मागण्याची घटना पुढे आल्यानंतर दानिशने विद्यापीठावर आरोप केले आहेत. दानिशने या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पण अलीगड मुस्लिम विद्यापीठाने हे आरोप फेटाळले आहेत!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा