32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरदेश दुनियायुक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा

युक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा

Google News Follow

Related

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी नेटोला युक्रेनमध्ये आपले सैन्य आणि शस्त्रे तैनात करण्याविरूद्ध सक्त इशारा दिला आहे. ते म्हणाले की अशी कृती रशियासाठी धोक्याची रेषा ओलांडण्याचे प्रतिनिधित्व करते आणि त्यामुळे अशा कोणत्याही कृतीला रशिया जोरदार प्रत्युत्तर देईल.

युक्रेनवर आक्रमण करण्याच्या रशियाच्या कथित हेतूबद्दल पाश्चात्य देशांच्या चिंतेवर भाष्य करताना ते म्हणाले की मॉस्कोला त्याच्या सीमेजवळील नेटो युद्ध अभ्यासाबद्दल तितकीच चिंता आहे.

ऑनलाइन गुंतवणूक मंचाच्या सहभागींशी बोलताना, रशियन अध्यक्ष म्हणाले की नेटोच्या पूर्वेकडील विस्तारामुळे मॉस्कोच्या मुख्य सुरक्षा हितांना धोका निर्माण झाला आहे. त्यांनी चिंता व्यक्त केली की NATO अखेरीस युक्रेनियन प्रदेशाचा वापर करून रशियाच्या कमांड सेंटर्सपर्यंत फक्त पाच मिनिटांत पोहोचू शकणारी क्षेपणास्त्रे तैनात करू शकते.

“अशा धमक्यांचा उदय आमच्यासाठी ‘धोक्याची रेषा’ दर्शवितो.” असं अध्यक्ष पुतिन म्हणाले. “मला आशा आहे की त्यांच्या स्वत:च्या देशांसाठी आणि जागतिक समुदायासाठी हिताची पावलं ते उचलतील.” ते पुढे म्हणाले की मॉस्कोला नवीन हायपरसॉनिक शस्त्रे विकसित करून वाढत्या धोक्यांचा सामना करण्यास भाग पाडले गेले आहे.

आम्ही काय केले पाहिजे? जे आम्हाला धमकावतात त्यांना लक्ष्य करण्यासाठी आम्हाला काहीतरी करावे लागेल आणि आम्ही ते आताही करू शकतो.” ते म्हणाले की, पुढील वर्षाच्या सुरुवातीला रशियन नौदलाच्या सेवेत दाखल होणारे नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तुलनेने वेळेत लक्ष्य गाठण्यास सक्षम असेल. “ऑर्डर जारी केल्यानंतर लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतील.” असं पुतिन म्हणाले.

हे ही वाचा:

चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत

आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब

सर्व कोरोना रुग्ण समान आहेत, पण काही रुग्ण इतरांपेक्षा अधिक समान आहेत

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

“मोठी शस्त्रे वाहून नेणारे आणि अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेले स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स आमच्या सीमेपर्यंत २० किमीपर्यंत उड्डाण करत होते. ते आमच्यासाठी धोक्याचे चिन्ह आहे.” असं पुतिन म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा