29 C
Mumbai
Thursday, August 18, 2022
घरराजकारण'क्लीन चिट मिळाल्यामुळे मोदींचे नेतृत्व झळाळून निघाले'

‘क्लीन चिट मिळाल्यामुळे मोदींचे नेतृत्व झळाळून निघाले’

Related

गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिलेल्या क्लिनचीटला आव्हान देणारी माजी काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या विधवा पत्नी झाकिया यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, २४ जून रोजी फेटाळली आणि एसआयटीचा अहवाल कायम ठेवला आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे.

गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप हे राजकीय सुडातून झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. नरेंद्र मोदींचे नेतृत्व हे सोन्यासारखं झळाळून निघालं असल्याचे अमित शाह म्हणाले. २००२ साली गुजरात मध्ये झालेले दंगे हे सुनियोजीत नव्हते तर स्वप्रेरीत होते, असंही अमित शाह म्हणाले.

“१८-१९ वर्षांची लढाई देशाचा इतका मोठा नेता एक शब्दही न उच्चारता, भगवान शंकराने ज्याप्रमाणे विष प्राषण केले त्याप्रमाणे सर्व दु:ख सहन करून लढत राहिला. आज सत्य हे सोन्यासारखे बाहेर आले आहे. मी नरेंद्र मोदींना फार जवळून हे दुःख झेलताना पाहिले आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरु असल्याने आम्ही काहीच बोललणार नाही हे एक खंबीर मनाची व्यक्तीच करु शकते. आताची मुलाखत मी २००३ मध्ये गुजरातचा गृहमंत्री म्हणून देऊ शकलो असतो. पण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मोदींनी यावर काही भाष्य केले नाही. शांतपणे सहन करत राहिले,” असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

“१९ वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने जो निकाल दिला आहे त्यानुसार पंतप्रधान मोदींवर लागलेले सर्व आरोप नाकारले आहेत. हे आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे भाजपा सरकारव जो डाग लागला होता तोही निघून गेला आहे. यावरुन पंतप्रधान मोदींनी लोकशाहीमध्ये संविधानानुसार काम कसे होऊ शकते याचे उदाहरण सर्व राजकीय पक्षांसमोर ठेवले आहे,” असे अमित शाह म्हणाले.

“ज्यांनी आरोप लावले त्यांनी आज पंतप्रधान मोदी आणि भाजपाची माफी मागायला हवी. दंगली झाल्याचे कोणीही नाकारत नाही. भाजपाचे विरोधी पक्ष, एका विचारधारेने प्रेरित राजकारणात आलेले पत्रकार आणि काही संस्थानी मिळून या आरोपांचा प्रचार केला, असेही अमित शाह म्हणाले.

हे ही वाचा:

फसलेला डाव आणि पवारांचा थयथयाट…

पाकने मृत घोषित केलेल्या २६/११ च्या हँडलरला घेतलं ताब्यात

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

‘माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणे ही राक्षसी महत्त्वाकांक्षा’

“पंतप्रधान नरेंद्र मोदींची पण चौकशी झाली होती. त्यांनी आंदोलन केले नाही. आम्ही कायद्याचे पालन केले. या प्रकरणी मलाही अटक करण्यात आली होती. पण एवढ्या मोठ्या लढाईनंतर सत्य जेव्हा समोर येते तेव्हा ते सोन्यापेक्षाही जास्त चमकते,” असे अमित शाह म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,912चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
23,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा