30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणमागचं सरकार फ़ेसबुकवरती होतं, पण जनतेत मृत होतं

मागचं सरकार फ़ेसबुकवरती होतं, पण जनतेत मृत होतं

फडणवीसांची अमरावतीत खोचक टीका

Google News Follow

Related

अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांत वसुलीचे नवनवीन उच्चांक आपल्याला बघायला मिळाले,अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजप पक्षाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री बोलत होते.यावेळी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
“सहा महिन्यांपूर्वी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना हे सरकार राज्यात सत्तेत आलं. सहा महिन्यांतच सरकार काय असतं? याची जाणीव जनतेला व्हायला लागली. मागचे अडीच वर्ष सरकार बंदीस्त होतं, दाराआड होतं. मागचं सरकार फेसबुकवरती होतं आणि जनतेत मृत होतं. त्या सरकारमध्ये केवळ वसुलीच दिसत होती. अडीच वर्षात वसुलीचे नवनवीन उच्चांक गेल्या सरकारने गाठलेले आपण बघितले”,अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अडीच वर्षात मंत्र्यांपासून सर्वच जेलमध्ये दिसले.आपल्याला वर्क फ्रॉम होम माहिती आहे मात्र, वर्क फ्रॉम जेल हा नवीन प्रकार आपल्याला अडीच वर्षात बघायला मिळाला. कारण मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांमध्ये एवढी हिंमत आणि नैतिकता नव्हती,की जेलमधल्या मंत्र्याचा ते राजीनामा स्वीकारतील.शेवटी सरकार पडून मंत्रीच बदलावे लागले. तेव्हाच त्यांचा कारभार बंद झाला,अशा प्रकारे अनैतिक सरकार जनादेशाचा विश्वासघात करून आमच्या पाठित खंजीर खूपसून ते सरकार आलं होतं.“मी मुख्यमंत्री असताना पाच वर्ष विदर्भ, मराठवाडा या भागांवर लक्ष केंद्रीत केलं.

हे ही वाचा:

आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?

महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!

…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार

२०१४ पूर्वी अमरावतीतील नांदगावपेठ एमआयडीसीमध्ये इंडिया बुल्स ही कंपनी होती. त्यानंतर आम्ही तिथे टेक्सटाईल पार्क उभं केलं शिवाय मोठ्या प्रमाणात इथे उद्योग आणले होते. मात्र, आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी जेव्हा त्यांना भेटलो, तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इतरही उद्योग सुरू करणार होतात, त्याचं काय झाले? तेव्हा ते मला म्हणाले, अडीच वर्षात आम्हाला जो त्रास भोगावा लागला त्या कारणामुळे आम्ही उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र,आज आमच्या सरकारने त्यांना आश्वस्त केलं आहे. यापुढे त्यांना असा कोणताही त्रास होणार नाही”, असेही फडणवीस पुढे म्हणाले.

भाजपचे रणजीत पाटील आणि महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात ही लढत होणार आहे.खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. देवेंद्रफडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत  यात शंका नाही, असं वक्तव्य या कार्यक्रमात नवनीत राणा यांनी केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा