29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण वसुलीच्या ‘मातोश्री कनेक्शन’ची जोरदार चर्चा

वसुलीच्या ‘मातोश्री कनेक्शन’ची जोरदार चर्चा

Related

कुणी निंदा वा वंदा, टक्केवारी, खंडणी आणि वसुली हाच शिवसेनेचा धंदा… अशा तिखट शब्दांत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी मोटार वाहननिरीक्षकाच्या लेटरबॉम्बसंदर्भात भाष्य करत ठाकरे सरकारवर शंरसंधान केले आहे.

मोटार वाहननिरीक्षक गजेंद्र पाटील यांनी प्रादेशिक परिवहन विभागातील वसुलीसंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे आणि त्यात थेट ‘मातोश्री कनेक्शन’चा उल्लेख केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यावरून भातखळकर यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गजेंद्र पाटील यांनी आपल्या पत्रातून टीका केली आहे. नागपूर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे या आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्यामार्फत कोट्यवधी रुपये अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात येतात, असा आरोप करत पाटील यांनी हा लेटरबॉम्ब टाकला आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे खरमाटे यांच्या हातातील बाहुले असल्याचा सनसनाटी आरोप या पत्रातून करण्यात आला असून शासनाने पदोन्नती आदेश काढल्यानंतरही पैसे मिळतील त्याच पद्धतीने पदस्थापना देण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. काही जणांना तर निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी पदस्थापना देण्यात आल्याचे म्हटले आहे.

आरटीओमधील अधिकारी संगनमत करून शासनाचा महसूल आपल्या खिशात कशापद्धतीने घालतात याचीही उदाहरणे दिली आहेत. नाशिकच्या परिवहन अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह मातोश्री कनेक्शनचा उल्लेख पत्रात केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही पत्रातून पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, मुंबई भाजपाने याचसंदर्भात ट्विट करत ठाकरे सरकारला घेरले आहे. जाऊ तिथे खाऊ…वसुली सरकारच्या घोटाळ्यांचे आकडे वाढतच आहेत. नाशिकमध्ये मुख्यमंत्री यांचे खासमखास मंत्री अनिल परब यांच्याविरोधात तब्बल ३०० कोटींच्या बदल्यांचा घोटाळा केल्याची तक्रार दाखल झाली आहे. बहुदा मातोश्री ३ ची तयारी असे ट्विट करत भाजपा मुंबईने परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा