29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर राजकारण ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा

ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा

Related

गुरुवारी ठाकरे सरकारमधील अनलॉकच्या मुद्द्यावरूनच सावळा गोंधळ चव्हाट्यावर आल्यानंतर ठाकरे सरकारवर जनता आणि विरोधी पक्ष यांच्याकडून चौफेर टीका केली जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी तर ठाकरे सरकारची पार पाळता भुई थोडी केली आहे. ‘ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा’ असा सणसणीत टोला भातखळकर यांनी लगावाला आहे.

महाराष्ट्राचे आपत्ती निवारण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाच टप्प्यात राज्यात अनलॉक होणार असल्याचे सांगितले. तर पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या राज्यातील १८ जिल्ह्यात अनलॉक होणार असल्याची माहिती दिली. पण पुढच्या काही वेळातच राज्य सरकार मार्फत हे स्पष्ट करण्यात आले की राज्यातील कोविड निर्बंध अद्याप हटवले गेले नसून नव्या नियमांचा प्रस्ताव अजूनही विचाराधीन आहे. यामुळे राज्यात अजूनही लॉकडाऊन कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकार मधील विसंवादही चव्हाट्यावर आला आहे.

यावरूनच एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना आमदार अतुल भातखळकर म्हणतात की सरकारमध्ये डाव्या हाताचे काय चालू आहे ते उजव्या हाताला माहित नसते आणि उजवा हात काय करतो हे डाव्याला माहित नसते. तर सरकारमधील तिन्ही पक्ष अनलॉकचे श्रेय घेण्यासाठी धडपडत आहेत असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

हे सरकार की सर्कस?
तर त्या आधी ट्विटरच्या माध्यमातूनही भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो तसं काही नाही हो… हे सरकार आहे की सर्कस? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा