28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारण२०१९, २०२४च्या मतदानपद्धतीत कोणतीही उलथापालथ नाही! गुप्ता यांचे स्पष्टीकरण

२०१९, २०२४च्या मतदानपद्धतीत कोणतीही उलथापालथ नाही! गुप्ता यांचे स्पष्टीकरण

निवडणुकीच्या मध्यात असा फार मोठा बदल होण्याची शक्यता नसते

Google News Follow

Related

निवडणूक अंदाज व्यक्त करणाऱ्या ऍक्सिस माय इंडियाचे प्रदीप गुप्ता यांनी आताच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पद्धतीत फार मोठा बदल बघितलेला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. इंडिया टुडेशी झालेल्या संवादात राजदीप सरदेसाई यांनी वारंवार २०१९ आणि २०२४ यात बदल झाल्याचे दिसते का, असे विचारण्याचा प्रयत्न केला तरी प्रदीप गुप्ता यांनी असा कोणताही बदल दिसत नसल्याची निक्षून सांगितले.

गुप्ता म्हणाले की, फार मोठा बदल होणार असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा इकडची गोष्ट तिकडे जाणार असा त्याचा अर्थ असतो. पण मी या निवडणुकीत असे चित्र अजिबात पाहात नाही. चौथ्या टप्प्याच्या मतदानानंतर बोलताना गुप्ता यांनी आपले हे म्हणणे मांडले.

गुप्ता म्हणाले की, निवडणुकीच्या मध्यात असा फार मोठा बदल होण्याची शक्यता नसते. अशा निवडणुकांमध्ये ३०-४० टक्के मतदार हे एखाद्या पक्षाचे हमखास मतदार असतात. तर २०-३० टक्के मतदार हे कुंपणावरचे असतात. ते निर्णायक ठरतात. विजेते आणि पराजित यांच्यात १०-२० टक्के मतांचा फरक असतो. कुंपणावरचे मतदार जे असतात ते निवडणुकीच्या आधी महिनाभर आपला विचार पक्का करतात.

हे ही वाचा:

राहुल गांधींनी आपला पराजय पाहिला आहे, देशात त्यांना ४० जागाही मिळणार नाहीत!

घाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार

सलमान खान गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणामधून ठोकल्या बेड्या

राहुल गांधी भाजपाच्या अभिनव प्रकाश यांच्याशी ‘डिबेट’ करून दाखवा!

महाराष्ट्रातील निवडणुकीबद्दल ते म्हणाले की, राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे बदललेले आहे. मतदारही संभ्रमात आहेत. कोण कुठे निवडणूक लढवत आहे याविषयी लोकांच्या मनातही संभ्रम आहे. अगदी पहिल्या टप्प्यापासून हा संभ्रम कायम आहे. मतदारच म्हणत आहेत की, त्यांना आपले उमेदवार ठाऊक नाहीत.

महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे याच निवडणुकीत नाहीत तर येणाऱ्या ५० वर्षातही कायम राहतील. पण त्या मुद्द्यांना नीट हाताळले जाणे आवश्यक आहे.

प्रशांत किशोर एनडीए विजयाबद्दल ठाम

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, उत्तर आणि पश्चिमेत भाजपाच्या जागांमध्ये फार मोठा बदल संभवत नाही. भाजपाकडे ३०० जागा आहेत आणि त्यात बदल होईल असे वाटत नाही. भाजपा एनडीएला ४०० जागा मिळणार नाहीत पण ते २००पर्यंत खाली येणार नाहीत. त्यासाठी त्यांनी उत्तर आणि पश्चिमेत १०० जागा गमवाव्या लागतील. जे म्हणत आहेत की भाजपा २०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाहीत त्यांनी सांगावे की भाजपा १०० जागा नेमक्या कुठे गमावणार आहेत?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा