29.5 C
Mumbai
Thursday, May 21, 2026
घरराजकारणममता बॅनर्जी जिंकाव्या, अशी बांगलादेशी खासदाराची इच्छा...

ममता बॅनर्जी जिंकाव्या, अशी बांगलादेशी खासदाराची इच्छा…

एक्झिट पोलमध्ये भाजपाचा

Google News Follow

Related

एकीकडे पश्चिम बंगालमध्ये काय निकाल लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. अशात बांगलादेशलाही पश्चिम बंगालच्या निकालाची चिंता लागून राहिल्याचे उदाहरण समोर आले आहे. एका व्हीडिओत बांगलादेशातील खासदाराला पश्चिम बंगालच्या निवडणुकीतून कसली अपेक्षा आहे, ते स्पष्ट झाले आहे.

बांगलादेश मधील खासदार अख्तर हुसेन यांनी इशारा दिला की, जर भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आला, तर बांगलादेशसमोर निर्वासितांचे, मानवाधिकारांचे, आर्थिक संकट उभे राहू शकते. याच वेळी हिमंत बिस्वा सरमा यांच्या अलीकडील वक्तव्यांवर औपचारिक आक्षेपही बांगलादेशात नोंदविण्यात आला.

रंगपूर येथून नॅशनल सिटिझन पार्टी (एनसीपी) चे खासदार असलेले अख्तर हुसेन यांनी बंगालच्या निवडणूक प्रवाहांवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की एक्झिट पोलमध्ये भाजप मजबूत होत असल्याचे संकेत दिसत आहेत आणि त्यांचे सरकार आले तर ते बांगलादेशींना हुसकावून देतील आणि त्याचा फटका आपल्याला बसेल.

हे ही वाचा:

तेलदरांच्या किमती उच्च पातळीवर स्थिरावल्या

मुंबईत १७४५ कोटींचे कोकेन जप्त

एप्रिल २०२६ मध्ये जीएसटी महसूल विक्रमी

१ मेपासून नवे नियम लागू; OTP शिवाय गॅस मिळणार नाही

‘मानवतावादी संकट’चा इशारा

बांगलादेशच्या संसदेत बोलताना अख्तर हुसेन यांनी म्हटले, “जर पश्चिम बंगालमध्ये एक्झिट पोल भाजपचा विजय दाखवत असतील आणि पक्षाने सरकार स्थापन केले, तर ते ‘कांगलू’ना (कथित बांगलादेशी घुसखोर) बांगलादेशात पाठवले जाईल.  यामुळे आमच्यासाठी मोठे मानवतावादी, आर्थिक आणि निर्वासितांचे संकट निर्माण होईल.”

त्यांचा उल्लेख त्या व्यक्तींविषयी होता, ज्यांना भारतात बेकायदेशीररित्या राहणारे बांगलादेशी स्थलांतरित मानले जाते.

ढाकाने भारतीय दूताला बोलावणे धाडले

वाढत्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने गुरुवारी ढाका येथे भारताचे कार्यवाहक उच्चायुक्त पवन बाढे यांना तलब केले. त्यांना परराष्ट्र मंत्रालय मध्ये बोलावून हिमंत बिस्वा सरमा यांच्या विधानांवर तीव्र आक्षेप नोंदवला गेला. अधिकाऱ्यांच्या मते, ही विधाने अनुचित असून द्विपक्षीय संबंधांसाठी हानिकारक आहेत.

सरमा यांच्या वक्तव्यांमुळे वाढला तणाव

हा विरोध १५ एप्रिल रोजी दिलेल्या मुलाखतीनंतर समोर आला, ज्यामध्ये हिमंत बिस्वा सरमा यांनी भारत-बांगलादेश संबंधांवर वादग्रस्त विधाने केली होती. त्यांनी म्हटले होते की, ते इच्छितात की दोन्ही देशांमधील संबंध सुधारू नयेत, कारण संबंध सुधारल्यास बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवणे कठीण होते. त्यांनी हेही सांगितले की आसाममधील लोकांना भारत आणि बांगलादेश यांच्यात तणावपूर्ण संबंध अधिक सुरक्षित वाटतात.

याशिवाय, त्यांनी दावा केला की सीमा सुरक्षा दल अनेकदा अशा व्यक्तींना ताब्यात ठेवते आणि संधी मिळाल्यावर त्यांना सीमेपलीकडे पाठवले जाते. हा संपूर्ण घटनाक्रम भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक तणाव आणखी वाढवू शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
308,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा